मुंबई- प्रत्येक अभिनेत्याचे मुंबई मायानगरीत स्वतःचे आलिशान घर असावे असे स्वप्न असते. संघर्षाच्या काळात या शहरात येऊन पडेल त्या जबाबदाऱ्या उचलत मिळेल तिथे आसरा घेत कलाकार काम करत असतात. याच स्ट्रगलमधून गेलेला अभिनेता कार्तिक आर्यने घर घेण्याचे स्वप्न सत्यात उतरले आहे. मुंबईतील रिअल इस्टेट मालमत्तेमध्ये मोठी रक्कम खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. कार्तिकने मुंबईतील चकाचक जुहू परिसरात एक आलिशान अपार्टमेंट विकत घेतली आहे. विशेष म्हणजे याच अप्रटमेंटमध्ये त्याच्या कुटुंबाची आधीच एक अपार्टमेंट आहे. गेल्या ३० जून रोजी हा अपार्टमेंट खरेदीचा व्यवहार पूर्ण झाला असून याची खरेदी १७. ५० कोटीमध्ये निश्चित झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कार्तिकने जुहु परिसारातील सिद्धी विनायक सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावर १५३६ स्क्वेअर फुटांची एक भव्य प्रॉपर्टी खरेदी केली आहे. याची नेमकी किंमत ७.४९ कोटी होत असली तरी त्याने ही अपार्टमेंट १७.५० कोटी इतक्या चढ्या बावाने खरेदी केली आहे. १ लाख ९ हजार पर स्क्वेअर फुट अशा दरात त्याने ही खरेदी केल्याने हा एक मोठा व्यवहार समजला जात आहे. याच सोसायचीमध्ये जो जुहू स्कीममधील एन एस रोड क्रमांक 7च्या आठव्या मजल्यावर त्याच्या कुटुंबाच्या मालकीची एक जागा आहे.
कार्तिकने ही अपार्टमेंट जयेश आणि केतकी दोशी यांच्याकडून खरेदी केलीय. यासाठी निश्चित करण्यात आलेली स्टॅम्प ड्युटी कार्तिकने भरली आहे. या शिवाय या सोसायटीत पार्किंगसाठी दोन जागाही त्याने खरेदी केल्याचे सांगितले जात आहे.
कार्तिकने आपली आई डॉ. माला तिवारी यांच्यावर अपार्टमेंटच्या आवश्यक गरजा पाहण्याची जबाबदारी सोपवल्याचे समजते. यापूर्वी त्याने वर्सोवा येथे ४५९ स्क्वेअर फुटाचा फ्लॅट खरेदी केला होता. विशेष म्हणजे याच फ्लॅटमध्ये तो पेईंग गेस्ट म्हणून पूर्वी राहिला होता.