मुंबई : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या करिअरमध्ये असे दोन चित्रपट आले ज्याने त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकले. पहिला होता 'सोनू के टीटू की स्वीटी' ज्याने त्याला ए-लिस्ट कलाकारांच्या श्रेणीत उभे केले आणि दुसरा चित्रपट 'भूल भुलैया २', ज्यामुळे त्याच्या कारकिर्दीने मोठी झेप घेतली . मात्र, याच दरम्यान प्रदर्शित झालेल्या 'शहजादा' चित्रपटाने चित्रपटरसिकांची निराशा केली. हा चित्रपट २००२ मध्ये आलेल्या सुपरहिट तेलुगु चित्रपट 'अला वैकुंठपुरमलो'चा रिमेक होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कार्तिकने चित्रपटाच्या अपयशाबद्दल सांगितले. त्याने सांगितले की हा चित्रपट कदाचित चालला नाही कारण तो रिमेक होता.
मी पुन्हा कधीही रिमेक करणार नाही :कार्तिकने दिलेल्या मुलाखतीत म्हटले, 'या चित्रपटाच्या फ्लॉपनंतर मला सर्वात मोठा धडा मिळाला, तो म्हणजे मी यापुढे 'रिमेक' चित्रपट करणार नाही. 'रिमेक' चित्रपटामध्ये काम करण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. मी या चित्रपटाद्वारे एक नवा अनुभव घेत होतो.
या चित्रपटात कार्तिकच्या आणि क्रिती सेनॉन एकत्र दिसले :शूटिंग करताना मला काहीच वाटले नाही. पण शूटिंगनंतर मला असे वाटले हे असे आहे जे लोकांनी याआधी पाहिले आहेत. मग ते पुन्हा हा चित्रपट पाहण्यासाठी पैसे खर्च करून चित्रपटगृहामध्ये जातील का ? या चित्रपटातून मला मिळालेला हा सर्वात मोठा धडा होता. 'शहजादा' चित्रपटाने जगभरात ४७. ४३ कोटींची कमाई केली. दरम्यान, या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर ३८.३३ कोटी रुपयांची कमाई केली होती. सुपरहिट तेलुगु चित्रपट 'अला वैकुंठपुरमलो'मध्ये अल्लू अर्जुन हा मुख्य भूमिकेत असून त्याच्यासोबत पूजा हेगडेने काम केले आहे.
कार्तिक आर्यनचा वर्क फ्रंट : दरम्यान, कार्तिक आर्यन पुढे कबीर खान दिग्दर्शित 'चंदू चॅम्पियन'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट जर्मनीतील १९७२ उन्हाळी पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा भारताचा पहिला पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित असल्याचे म्हटले जात आहे. अलीकडेच तो 'सत्यप्रेम की कथा'मध्येही दिसला होता.