महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Chandu Champion First Look : कार्तिक आर्यनचा आगामी 'चंदू चॅम्पियन'चा फर्स्ट लूक रिलीज... - फर्स्ट लूक

कार्तिक आर्यनचा आगामी 'चंदू चॅम्पियन' चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये कार्तिक हा खूप वेगळ्या अंदाजात दिसत आहे.

Chandu Champion First Look
चंदू चॅम्पियनचे फर्स्ट लूक

By

Published : Aug 1, 2023, 4:40 PM IST

मुंबई :आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये यश मिळवणारा कार्तिक आर्यन सध्या बॅक टू बॅक हिट चित्रपट देत आहे. कार्तिकच्या अभिनयाने सर्व चित्रपट निर्माते खूपच प्रभावित झाले आहेत. अभिनेत्यासोबत काम करण्यास सगळेच उत्सुक आहेत. त्याचा 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. आता त्याने कबीर खानसोबतच्या 'चंदू चॅम्पियन' या नव्या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. या चित्रपटातून त्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे. कार्तिक आर्यन स्टारर कबीर खान दिग्दर्शित आगामी स्पोर्ट्स ड्रामा 'चंदू चॅम्पियन' चित्रपटाची घोषणा झाल्यानंतरच हा चित्रपट खूप चर्चेत राहिला आहे. दरम्यान आता निर्मात्यांनी या चित्रपटातील चंदूच्या भूमिकेत कार्तिक आर्यनचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे.

कार्तिक आर्यनचा लूक कसा आहे? : 'चंदू चॅम्पियन'मधील कार्तिक आर्यनचा पहिला लूक लक्षवेधी आहे. आतापर्यंत त्याने साकारलेल्या सर्व पात्रांपेक्षा हे पात्र वेगळे दिसत आहे. 'चंदू चॅम्पियन'च्या पोस्टरमध्ये कार्तिकचे केस छोटे दिसत असून त्याने भारतीय ब्लेझर घातलेला दिसत आहे. यासोबतच त्याच्या चेहऱ्यावर काही जखमही दिसत आहेत, याशिवाय पोस्टरमध्ये कार्तिकचे डोळे खूप गंभीर दिसत आहे. कार्तिकच्या या लूकमुळे प्रेक्षकांची उत्सुकता खरोखरच वाढली आहे. साजिद आणि वर्धा नाडियाडवाला यांच्या उपस्थितीत या चित्रपटाचे शूटिंग काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये सुरू झाली होती.

चंदू चॅम्पियनच्या फर्स्ट लूकवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया : 'चंदू चॅम्पियन'मधील कार्तिक आर्यनच्या फर्स्ट लूकवर त्याच्या चाहत्यांनी कमेंट विभागात प्रतिक्रिया देत त्याचे कौतुक केले आहे. कार्तिकच्या बहुतेक चाहत्यांनी फायर इमोजीसह त्याच्या फर्स्ट लूकवर खूप जबरदस्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. कार्तिकचे चाहते आधीच त्याच्या या चित्रपटाला हिटचा टॅग देत आहेत. साजिद नाडियादवाला आणि कबीर खान यांची संयुक्त निर्मिती असलेल्या 'चंदू चॅम्पियन'चे दिग्दर्शन कबीर खान करत आहेत. या चित्रपटात कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट १४ जुलै २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. कार्तिक आर्यन पहिल्यांदाच स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटात दिसणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details