महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Kartik Aaryan : 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाने उडली कार्तिक आर्यनची झोप - साजिद नाडियादवाला

बॉलिवूडचा 'प्रिन्स' कार्तिक आर्यन त्याच्या आगामी 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटातून पुन्हा एकदा चाहत्यांचे मने जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याने मध्यरात्री इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत आपल्या भावना त्यांच्या चाहत्यांना सांगितल्या आहे.

Kartik Aaryan
कार्तिक आर्यन

By

Published : Jun 6, 2023, 12:54 PM IST

मुंबई :'शेहजादा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर, बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या आगामी 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाद्वारे त्याच्या चाहत्यांची मने जिंकण्यासाठी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर आपला जादू दाखविण्यासाठी आला आहे. त्याला त्याच्या या चित्रपटापासून फार अपेक्षा आहे. 'सत्यप्रेम की कथा'चा ट्रेलर 5 जून रोजी रिलीज झाला असून हा ट्रेलर चाहत्यांना फार आवडला आहे. हा चित्रपट 29 जून रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. इकडे चित्रपट रिलीज होण्यापूर्वी कार्तिक आर्यनची झोप उडाली आहे. कार्तिकने सांगितले आहे की त्याला दोन कारणांमुळे नीट झोप येत नाही. शेवटी, कुठले कारण आहे की ज्यामुळे त्यांची झोप उडली आहे. चला जाणून घेवूया...

सत्यप्रेम की कथा :कार्तिक आर्यनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मध्यरात्री एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तो 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाच्या टीमसोबत दिसत आहे. त्याने इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहे. ज्यामध्ये त्याच्यासोबत चित्रपट निर्माता साजिद नाडियादवाला आणि अभिनेत्री कियारा अडवाणी दिसत आहेत. या फोटोंमध्ये कार्तिक आर्यन खूप आनंदी दिसत आहे. पण ही फोटो शेअर करून त्याने एक विचित्र कॅप्शन लिहिले आहे. त्याने लिहिले आहे की, 'काल रात्री मी अस्वस्थतेमुळे झोपू शकलो नाही आणि आज आनंद, प्रेमामुळे झोपू शकलो नाही'. सध्याला कार्तिक 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटासाठी फार उत्साहित आहे, त्यामुळे त्याच्या मनात संमिश्र भावना येत आहेत. तसेच 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाचे दिग्दर्शिक समीर विद्वांस आहे. या चित्रपटाची घोषणा जून 2021 मध्ये झाली होती.

भूल-भुलैया-2 :कार्तिक आर्यनच्या 12 वर्षांच्या फिल्मी करिअरमधील हा 16 वा चित्रपट आहे. तसेच त्याचा हा कियारा अडवाणीसोबतचा दुसरा चित्रपट आहे. याआधी ही जोडी 'भूल-भुलैया-2'मध्ये एकत्र दिसली होती. या चित्रपटाने 250 कोटींहून जास्त बॉक्स ऑफिसवर कमाई केली होती. 'सत्यप्रेम की कथा' चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

हेही वाचा :

  1. Nysa Devgan : न्यासा देवगण पुन्हा दिसली कथित बॉयफ्रेंडसोबत, पहा फोटो
  2. Monika Bhadoriya News : तारक मेहता का उल्टा चष्मामधील बावरीनेही निर्मात्यावर केले गंभीर आरोप, म्हणाली...
  3. World Environment Day 2023 : सेलिब्रिटींनी असा साजरा केला पर्यावरण दिवस

ABOUT THE AUTHOR

...view details