मुंबई - बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी त्यांच्या सत्यप्रेम की कथा या नवीन चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतले आहेत. द कपिल शर्मा शोच्या आगामी भागामध्ये कियारा आणि कार्तिक सत्यप्रेम की कथा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये पाहुणे म्हणून दिसणार आहेत. मंगळवारी ऑनलाइन शेअर केलेल्या एपिसोडच्या प्रोमो व्हिडिओमध्ये, शोचा होस्ट कपिल शर्मा कार्तिकच्या 'प्यूअर' हृदयाची खिल्ली उडवताना दिसला आणि कलाकार सदस्य कृष्णा अभिषेकने देखील कार्तिकची भरपूर मस्करी केली.
कपिल शर्माने उडवली कार्तिकची खिल्ली - व्हिडिओच्या सुरुवातीला, कार्तिक आणि कियारा यांना लव्ह आज कल या चित्रपटातील हां में गलत गाण्यावर नाचताना दिसतात. दोघांच्याही हातामध्ये पांढऱ्या रंगाचे ह्रदय हे. कपिल विचारतो की, 'ह्रदय तर लाल रंगाचे असते मग हे पांढरे कसे काय?' त्यावर कार्तिक म्हणतो की, 'कारण हे ह्रदय प्यूअर आहे'. त्यावर गंमतीने कपिल म्हणतो, 'हे झाले कियाराचे , तुझ्या ह्रदयाचे काय?' त्यावर सर्वजण हसायला लागतात.