मुंबई : कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी स्टारर चित्रपट 'सत्यप्रेम की कथा'ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. हा चित्रपट २९ जून रोजी प्रदर्शित झाला होता. शिवाय आता ११ जुलै रोजी या चित्रपटाला रिलीजचा १३ वा दिवशी सुरू झाला आहे. या चित्रपटाने १२ दिवसांत देशांतर्गत चित्रपटगृहांमध्ये सुमारे ७० कोटींचा व्यवसाय केला आहे. तसेच आता चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे तर या चित्रपटाने १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. याबद्दलची माहिती ही चित्रपट निर्माते साजिद नाडियाडवाला आणि कार्तिक-कियारा यांनी चाहत्यांना दिली आहे. 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाने जगभरात १०० कोटींचा व्यवसाय केला आहे. या १२ दिवसांत चित्रपटाने आतापर्यंत किती कमाई केली आहे ते जाणून घेऊया.
कार्तिक-कियाराने आनंद व्यक्त केला : 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाच्या जगभरातील १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना, कियारा अडवाणीने लिहिले, 'सत्यप्रेम की कथाला इतके प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद'. दरम्यान आता कार्तिक आर्यनचा आनंदही सातव्या गगनाला भिडला आहे. त्याने आपल्या थँक्स पोस्टमध्ये '१०० कोटींच्या प्रेमासाठी धन्यवाद' असे लिहिले आहे. यापुर्वी देखील कार्तिकने पोस्टद्वारे चाहत्यांना धन्यवाद म्हटले होते. यावेळी चित्रपटाची संपूर्ण कास्ट आणि निर्माते, दिग्दर्शक फार जास्त आनंदी आहे. या चित्रपटात सर्व कलाकारांनी चांगला अभिनय केला आहे. याशिवाय या चित्रपटाचे गाणे देखील फार हिट झाले आहे. त्यामुळे अनेक प्रेक्षक हा चित्रपट बघायला चित्रपटगृहांमध्ये जात आहे. मात्र लवकरच 'ओ माय गॉड २' आणि 'गदर २' हा रूपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे त्यामुळे हे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाई केली पाहिजे. त्यानंतर हा चित्रपट सुप्परहिट लिस्टमध्ये देखील सामील होईल.