महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

कतरिना कैफ विजय सेतुपती स्टारर 'मेरी ख्रिसमस'मधील पहिलं गाणं प्रदर्शित - पहिलं गाणं रिलीज

Merry christmas movie : अभिनेत्री कतरिना कैफ आणि विजय सेतुपती अभिनीत 'मेरी ख्रिसमस' हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे. दरम्यान या चित्रपटामधील पहिलं गाणं रिलीज करण्यात आलं आहे.

Merry christmas movie
मेरी ख्रिसमस चित्रपट

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 10, 2024, 5:31 PM IST

मुंबई - Merry christmas movie :अभिनेत्री कतरिना कैफ आणि विजय सेतुपती स्टारर थ्रिलर 'मेरी ख्रिसमस' चित्रपट हा सध्या खूप चर्चेत आहे. श्रीराम राघवन दिग्दर्शित हा चित्रपट सुरुवातीला गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु नंतर तारीख बदलण्यात आली. याशिवाय नुकतेच सोशल मीडियावर अरिजित सिंगनं गायलेलं एक रोमँटिक ट्रॅक रिलीज करण्यात आलं आहे. 10 जानेवारी रोजी, 'मेरी ख्रिसमस'च्या निर्मात्यांनी 'रात अकेली थी' हा ट्रॅक प्रदर्शित करून कतरिनाच्या चाहत्यांना एक भेट दिली आहे. शेअर केलेल्या गाण्यात कॅटरिना कैफ आणि विजय सेतुपती एकत्र दिसत आहेत.

'मेरी ख्रिसमस' चित्रपटातील पहिल गाणं प्रदर्शित : कॅटरिना कैफ आणि विजय सेतुपती ऑन-स्क्रीन केमिस्ट्री या गाण्यात खूप सुंदर दिसत आहे. 'रात अकेली थी' या गाण्याला प्रीतम यांनी संगीत दिलं आहे. या गाण्याला वरुण ग्रोव्हरनं लिहिलं आहे. 'मेरी ख्रिसमस' हा श्रीराम राघवन दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात कतरिना कैफ, विजय सेतुपतीशिवाय अश्विनी काळसेकर, राधिका आपटे,गोवित्रीकर, संजय कपूर,टीनू आनंद,विनय पाठक, प्रतिमा कणनं यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट हिंदी आणि तमिळ अशा दोन्ही भाषांमध्ये शूट करण्यात आले असून दोन्ही आवृत्त्यांसाठी वेगवेगळे सह-कलाकार आहेत. या चित्रपटामध्ये कॅटरिना कैफ ही वेगळ्या अंदाजात दिसेल.

मेरी ख्रिसमसबद्दल :'मेरी ख्रिसमस' चित्रपट हिंदी आणि तमिळमध्ये एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 12 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित होईल. कॅटरिना कैफ चाहते या चित्रपटाची वाट आतुरतेनं पाहात आहेत. दरम्यान कतरिना आणि विजयच्या वर्क्रफंटबद्दल बोलायचं झालं तर ती फरहान अख्तर 'जी ले जरा' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. याशिवाय ती ही 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटात कार्तिक आर्यनबरोबर दिसेल. दुसरीकडे विजय सेतुपतीबद्दल बोलायचं झालं तर तो 'पिसासू 2', 'सूधू कव्वम 2' , 'ट्रेन' ,'तमिळ इदम पोरुल इवल', 'महाराजा' आणि 'गांधी टॉक्स' या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. हिंदी दिवसानिमित्त हे स्पेशल बॉलिवूड चित्रपट जरूर पाहा
  2. आयरा आणि नुपूरचं शाही लग्न, संगीत सोहळ्यात आमिर खानचा दमदार परफॉर्मन्स
  3. 'सालार'नं 700 कोटी क्लबमध्ये केली एंन्ट्री

ABOUT THE AUTHOR

...view details