मुंबई- Saif return to Mumbai from Swiss vacay : बॉलिवूडचे प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडपे करीना कपूर खान आणि सैफ अली खान आणि त्यांची मुले तैमूर आणि जेह स्वित्झर्लंडमध्ये नवीन वर्षाची सुट्टी घालवून मुंबईला परतली आहेत. मुलाबाळांसह विमानतळातून बाहेर पडत असतानाचे सैफ अली फॅमिलीचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत.
विमानतळावरून बाहेर पडताना करीनाने जेहचा हात धरला होता, तर तैमूर आणि सैफ अली खान मागे चालताना दिसले. विमान प्रवासात करीनाने राखाडी टी-शर्ट घातला होता जो तिने डेनिम आणि बूटसह मॅच केला होता, तर सैफने काळा टी-शर्ट, पॅंट, कॅप आणि शूज घातले होते.
व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये जेह खूप रडताना दिसत आहे, कारण डॅडी सैफने त्याला पुढच्या सीटवर न बसण्याची आणि मागच्या बाजूला बसण्याची सूचना केली होती. जेह रडू लागल्यानंतर अखेरीस त्याची आई करिनाने त्याची समजूत घातली आणि त्याला शांत केले.
वर्षाचा शेवटचा दिवस साजरा करण्याआधी करीनाने कौटुंबिक क्षण टिपण्याची संधी सोडली नाही. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला करिनाने चाहत्यांना तिच्या स्वित्झर्लँड सुट्टीची एक झलक दाखवली. पहिल्या फोटोत सेल्फी क्वीन करीनाने रंगीबेरंगी मखमली शरारा सूट परिधान केल्याचे दिसत आहे. चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी करीनाने हलका मेकअप केला होता आणि केसामध्ये लाल गुलाब माळून तिने बन स्टाईलमध्ये बांधला होता.