महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Kareena Kapoor reveals : सैफसोबत लिव्हइनमध्ये 5 वर्षे राहिल्यानंतर 'लग्न का केलं', करीना कपूरचा खुलासा - अभिनेता सैफ अली खान

Kareena Kapoor reveals : अभिनेत्री करीना कपूरनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता सैफ अली खानशी लग्न करण्याच्या तिच्या निर्णयाबद्दल खुलासा केलाय. लग्नापूर्वी 5 वर्षे ते एकत्र राहात होते. दोन मुलांचं पालक म्हणून त्यांचं संगोपन करत असताना त्यामागे ते कसा विचार करतात यावरही तिनं भाष्य केलंय.

Kareena Kapoor reveals
सैफ अली खानशी 'लग्न का केलं' याचा करीना कपूरनं केला खुलासा

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 14, 2023, 4:27 PM IST

मुंबई - Kareena Kapoor reveals : अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान हे बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. सहा वर्षांचा तैमूर आणि दोन वर्षांचा जेह यांच्यासोबत दोघांचा सुखी संसार सुरू आहे. त्यांनी 2012 मध्ये विवाह केला होता, पण त्यापूर्वी ते 5 वर्षे एकत्र राहात होते असा खुलासा करीनानं एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

मुलाखती दरम्यान करीना कपूर खाननं सांगितलं की, आजकाल लग्न करण्यामागील कारण असतं ते म्हणजे कुटुंब सुरू करणे. "म्हणजे आज याशिवायही नाही तर तुम्ही एकत्र राहू शकता," ती म्हणाली. तिनं पुढे सांगितले की मुले होण्यासाठी त्यांच्या नातेसंबंधात प्रगती करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी तिनं आणि सैफनं पाच वर्षे एकत्र घालवली होती.

तिच्या पालकत्वाच्या दृष्टिकोनाबद्दल सांताना करीना म्हणाली की, यासाठी कोणताही मार्ग योग्या किंवा चुकीचा असं असत नाही. असं करण्या ऐवजी ती आणि सैफ त्यांची मुले जेह आणि तैमूर अली खान यांना एक अद्वितीय व्यक्ती मानतात, त्यांचा आदर करतात आणि त्यांना त्यांच्या स्वत: च्या अटींवर वाढू देतात. करीनाने सांगितले की त्यांची मुले स्वतःचा मार्ग शोधतील आणि लवचिकतेने वाटचाल करतील. मानसिक आरोग्याला प्राधान्य देणाचा विचारही करीनानं बोलून दाखवला. ती म्हणाली की, तिला तिचे आयुष्य तिच्या मुलांसमोर जगायचे आहे आणि त्यांच्या सोबत सर्व काही अनुभवायचं आहे.

करीना आणि सैफने 2012 मध्ये लग्न लग्नगाठ बांधली आणि संसाराला सुरुवात केली. त्यांच्या या एकत्र प्रवासासोबतच त्यांनी ओमकारा (2006), टशन (2008), कुर्बान (2009), आणि एजंट विनोद (2012) सारख्या चित्रपटांमध्ये एकाच चित्रपटात भूमिका साकारत आपली ऑन स्क्रिन केमेस्ट्री दाखवली होती. त्या अगोदर सैफ अली खाननं अमृता सिंगसोबत विवाह केला होता. 13 वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघेही 2004 मध्ये विभक्त झाले आणि त्यांनी घटस्फोट घेतला. सैफ आणि अमृता यांना सारा अली खान ही 28 वर्षांची मुलगी आणि इब्राहिम अली खान हा 22 वर्षांचा मुलगा आहे.

हेही वाचा -

  1. Vicky Kaushal : 'कतरिना कैफ शिवाय कोण आवडतं' प्रश्नावर विकी कौशलचं मिश्किल उत्तर

2.Papa Meri Jaan: 'अनिमल'च्या नव्या गाण्यात रणबीर आणि अनिल कपूरमध्ये दिसलं पिता पुत्राचं नातं

3.54th Iffi: मायकेल डग्लस ठरणार 'इफ्फी'चं मुख्य आकर्षण, आंतरराष्ट्रीय फिल्म्ससाठी गोवा सज्ज

ABOUT THE AUTHOR

...view details