मुंबई : सैफ अली खान आणि करीना कपूर, बॉलिवूडमधील सर्वात सुंदर जोडप्यांपैकी एक आहे. नुकतेच मुंबई वांद्रेमधील एका रेस्टॉरंटच्या बाहेर या जोडप्याला स्पॉट करण्यात आले. त्यांच्यासोबत करिश्मा कपूर आणि अंकल कुणाल कपूर हे देखील उपस्थित होते. शुक्रवारी रात्री पापाराझीने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये करीना, सैफ अली खान, करिश्मा आणि कुणाल एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये करीना सैफच्या एखाद्या गोष्टीवर हसताना दिसत आहे. शिवाय यावेळी पापाराझीच्या फोटोग्राफरला करिनाने आणि कुणाल कपूरने पोझही दिली. करिनाने यावेळी पांढरा कुर्ता, काळी पँट आणि मॅचिंग सँडल परिधान केली होती.
करिनाने दिली पापाराझीना पोझ :सैफ यावेळी ब्लॅक शर्ट आणि डेनिममध्ये दिसला. करिश्मा ही ब्लॅक टॉप, स्कर्ट आणि ब्लॅक हिल्समध्ये यावेळी दिसली. तसेच कुणाल कपूर हा निळ्या कुर्ता आणि पायजमामध्ये होते. डिनरचा आनंद घेत असताना, करिश्माने तिच्या सोशल मीडिया स्टोरीमध्ये रेस्टॉरंटमध्ये काढलेले काही फोटोही शेअर केले. एक फोटो तिने तिच्या आवडत्या खाद्यपदार्थाचा शेअर केला असून त्यात तिने लोलो लव्हज असे लिहिले आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये ती लिफ्टमध्ये सेल्फी घेताना दिसत आहे. हे फोटो शेअर करत करिश्माने लिहिले, 'बर्याच दिवसांनी लिफ्ट'. अशी तिने पोस्ट केली आहे.