मुंबई - बॉलिवूडची बेबो करीना कपूर खानने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सैफ अली खानच्या हवेलीबाहेरचा आहे. या व्हिडिओमध्ये करीना कपूर खान पती सैफसोबत बॅडमिंटन खेळताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत करिनाने एक सुंदर कॅप्शन दिले आहे. 29 ऑगस्ट रोजी स्पोर्ट्स डे साजरा केला जातो, परंतु करीनाने असे काहीही व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेले नाही.
करीना कपूर खानने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती पती सैफसोबत बॅडमिंटन खेळताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करत करिनाने लिहिले की, 'काही सोमवारी नवऱ्यासोबत खेळ, वाईट नाही.. अम्मू तू खेळायला तयार आहेस का'.
करीनाच्या या व्हिडिओवर अनेक सेलिब्रिटींच्या कमेंट्स आल्या आहेत. यामध्ये करीनाच्या दोन्ही नणंद सबा आणि सोहा अली खान यांनीही कमेंट केली आहे. सोहा अली खानने कमेंट करत लिहिले, अमृता अरोराबद्दल माहीत नाही, पण मला नक्कीच खेळायचे आहे. अमृता अरोराने लिहिले, होय तू माझ्यासोबत खेळू शकते.