मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानला सोमवारी रात्री मुंबई विमानतळावर पापाराझींनी स्पॉट केले. करीना ही एफ1 ग्रँड प्रिक्ससाठी मोनॅकोला गेलेली होती. तिने नेहमीप्रमाणे दाखवून दिले आहे की ती फॅशनमध्ये कुठेच कमी पडत नाही. भारतात परत येताना तिने प्यूमाचा पांढरा जॉगर्स आणि पांढरा स्वेटशर्ट परिधान केला होता. तसेच पापाराझींनी तिला स्पॉट केल्यानंतर तिचा व्हिडिओ हा त्यांच्या अकाऊंटद्वारे त्यांनी पोस्ट केला आहे. या व्हिडिओत ती स्नीकर्स आणि काळ्या रंगाच्या सनग्लासमध्ये दिसत आहे. तसेच तिच्या हातात एक हँडबॅग आहे. करीनाने यासाठी नो-मेकअप लूक निवडला असून तिने केस बनमध्ये बांधले आहे. शिवाय यावेळी ती फार सुंदर दिसत आहे.
विमातळावरील बेबोचा लूक : तिचा विमानतळावरील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या विमानतळावरील लुकवर प्रतिक्रिया देताना एका सोशल मीडिया वापरकर्त्याने 'फायर बेबो' अशी कमेंट केली. दुसर्या वापरकर्त्याने 'बूमबॅस्टिक' अशी कमेंट दिली. आणखी एका युजरने कमेंट करत लिहले, 'मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझा ड्रेसिंग सेन्स खूप छान आहे.' इतर वापरकर्त्यांनी तिच्यावर लाल हृदय आणि फायर इमोजींचा वर्षाव केला आहे.