मुंबई - Kareena Kapoor Movie: हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री करीना कपूर रोहित शेट्टी दिग्दर्शित कॉप फ्रँचायझी 'सिंघम 3' या चित्रपटामुळं चर्चेत आहे. दरम्यान करीनाचं नाव एका रोमँटिक थ्रिलर चित्रपटाशी जोडले जात आहे. अलिकडेच एक बातमी समोर आली आहे की, करीना कपूर साऊथ अभिनेता यशच्या 'टॉक्सिक' या चित्रपटातून कन्नड फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश करणार आहे. दिग्दर्शक गीतू मोहनदास आणि सुपरस्टार यश लवकरच 'टॉक्सिक'मध्ये करीना कपूरच्या एन्ट्रीबाबत अधिकृत घोषणा करणार आहेत. यशच्या 'टॉक्सिक' चित्रपटाचे शुटिंग हे काही दिवसांनंतर सुरू होईल. 'टॉक्सिक'मध्ये करिना कपूरच्या एन्ट्रीच्या वृत्तामुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.
यशच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची एंट्री : गेल्या वर्षी डिसेंबर 2023 मध्ये यशनं त्याच्या चाहत्यांना नवीन वर्षाची मोठी भेट दिली होती. त्यानं 'टॉक्सिक' या चित्रपटाची घोषणा केली होती. यानतंर यशचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटाची वाट पाहात आहेत. आता या चित्रपटात करीना कपूर खान मुख्य भूमिकेत असल्याचं बोललं जात आहे. 'टॉक्सिक'चं शीर्षक उघड करताना यशनं एका व्हिडिओद्वारे चित्रपटाची पहिली झलक चाहत्यांना दाखवली होती. केव्हीएन प्रॉडक्शनने निर्मित केलेला हा चित्रपट 10 एप्रिल 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये साऊथ अभिनेत्री साई पल्लवी असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये या चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शन कामासाठी यश लंडनला गेला होता.