महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Kareena Kapoor vacation : करीना कपूरची युरोप सहल, शेअर केले मुलांसोबतचे सुंदर फोटो - Kareena Kapoor

करीना कपूरने मुलाबाळांसह युरोपची कौटुंबीक सहल नुकतीच केली. या सुट्टीतील काही सुंदर फोटो तिने चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Kareena Kapoor vacation
करीना कपूरची युरोप सहल

By

Published : Jul 24, 2023, 6:32 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने आपल्या फॉलोअर्सना चकित करण्यासाठी आपल्या युरोपच्या समर व्हेकेशनमधील काही जबरदस्त फोटो शेअर केले आहेत. करीनाने पती सैफ अली खान, मोठा मुलगा तैमुर आणि लहान मुलगा जहाँगिर अली खान यांच्यासोबत आपल्या शुटिंग शेड्यूलमधून वेळ काढत युरोप सहल एन्जॉय केली होती. करीनाने आता या सहलीचे सुंदर फोटो चाहत्यांसाठी दाखवले आहेत.

इन्स्टाग्रामवर करीनाने स्वतःचे काही फोटोही शेअर केले आहेत. स्मारकासमोर ती उभी असताना तिचा हा फोटो घेण्यात आला आहे. या फोटोत ती पांढऱ्या आणि निळ्या रंगाच्या कॅज्यअल ड्रेससध्ये दिसत आहे. हलक्या मेकअपसह तिने आपले केस मोकळे सोडले आहेत. याशिवाय तिने आपल्या कौटुंबीक सहलीतील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिने आपल्या मुलांसोबतचाही एक फोटो शेअर केला आहे. यात ती निळा शर्ट व डेनिम ट्राऊजरमध्ये फोटोत खूप सुंदर दिसत आहे.

तैमुरने तोंड उघडे ठेवून आश्चर्य चकित झाल्याचा भाव केल्याचा फोटोत दिसत आहे. यावेळी त्याने पांढरा शर्ट व काळ्या ट्राऊजर्ससह पांढरे शूज परिधान केले होते. लहान जेह निळा शर्ट आणि डेनिम घालून आपल्या विश्वात रमल्याचे दिसत आहे. कुठंतरी इंद्रधनुष्याखाली, असे कॅप्शन तिने फोटोला दिले आहे. फोटोत तिघेही एक विशाल वृक्षाखाली उभे असलेले दिसतात.

कामाच्या आघाडीवर करीना कपूर 'द क्रू' या चित्रपटात क्रिती सेनॉनसोबत झळकणार आहे. या चित्रपटाचे शुटिंग सध्या सुरू आहे. राजेश कृष्णन दिग्दर्शित हा चित्रपट २२ मार्च २०२२ रोजी रिलीज होणार आहे. याशिवाय ती सुजय घोषच्या 'द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स' या चित्रपटात विजय वर्मा आणि जयदिप अहलुवातसोबत काम करत आहे. दरम्यान, सैफ अली खान आदिपुरुष या चित्रपटात लंकेशच्या भूमिकेत दिसला होता. तो आगामी 'देवरा' चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूरसोबत काम करत आहे. तो आगामी 'भूत पोलीस' चित्रपटाच्या सीक्वेलमध्येही दिसणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details