मुंबई - Kareena Kapoor birthday : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री करीना कपूर खान उर्फ बेबो आज 43 वर्षांची झाली. तिच्यावर वाढदिवसानिमित्ताने अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला असून तिचे मोठी बहिण करिश्मा कपूरकडून तिला विशेष शुभेच्छा मिळाल्या. तिने वाढदिवसाची एक धमाल झलक शेअर केली आहे. गुरुवारी करिश्मा कपूरने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर करिनाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले.
करिश्माने करिनाच्या वाढदिवसाचा केक कापतानाचा एक फोटो शेअर केला आहे. तिने वाढदिवसाच्या केकचा क्लोजअपही दाखवला, यावर लिहिलं होतं, 'जाने जान हॅपी बर्थडे.' करिश्माने शेअर केलेल्या आणखी एका फोटोंमध्ये करीना आणि करिश्मा त्यांच्या सुंदर पोशाखात पोज देताना दिसत आहेत. यावेळी बर्थडे गर्ल करीनाने पिळ्या रंगाचा नक्षीदार ड्रेस मॅचिंग ट्राउझर्ससह परिधान केला होता. ग्लॅमरसाठी, तिने आपले केस पोनीटेलमध्ये बांधले होते आणि आकर्षक दिसण्यासाठी तिने स्टेटमेंट इअररिंग्ससह ओस हलका अप केला होता. या प्रसंगी करिश्माने व्हाइट कॉटन कॉर्ड सेट परिधान केला होता.
करीना कपूरचा जाने जान हा नवा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. २१ सप्टेंबरपासून हा सिनेमा नेटफ्लिक्सवर पाहाता येईल. या चित्रपटाचा ट्रेलर यापूर्वी रिलीज झाला होता, त्याला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. ओटीटी पदार्पणासाठी उत्सुक असलेली करीना कपूरने आधी एका निवेदनात महटले होते की, 'मी नेटफ्लिक्सवर एका खास चित्रपटासह येण्यासाठी उतावीळ झालीय. हे एक नवं लॉन्चिंग असल्यासारख वाटतं. यापूर्वी मी कधीही न केलेली भूमिका यात साकारत आहे. चित्रपटाची कथा खूप वेगळी आणि थरारक आहे. नेटफ्लिक्सने जगभरातील कलाकारांना यानिमित्ताने मोठे प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिलं आहे.
'जाने जान' हा चित्रपट पश्चिम बंगाल राज्यातील डोंगराळ भागात वसलेल्या कालिम्पॉंग शहराच्या सेटवर घडते. या चित्रपटात करीना कपूर रहस्यमय भूमिकेत पाहता येणार आहे. केगो हिगाशिनो यांनी लिहिलेल्या 'डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स' या बेस्ट सेलर कादंबरीचे हा चित्रपट म्हणजे अधिकृत हिंदी रुपांतर आहे. 'जाने जान' हा चित्रपट येत्या 21 सप्टेंबर रोजी ( आजपासून) नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.