मुंबई- निर्माता दिग्दर्शक करण जोहर 'स्टुटडंट ऑफ द इयर ३' बनवण्याच्या तयारीत आहे. यावेळी तो चित्रपट बनवत नसून वेब सिरीज बवण्याचे नियोजन करत असल्याचे समजते. 'स्टुटडंट ऑफ द इयर ३' हा प्रोजेक्टमधून स्टार किड शनाया कपूर पदार्पण करणार आहे. शनाया ही अभिनेता संजय कपूर आणि ज्वेलरी डिझायनर महिप कपूर यांची मुलगी आहे.
शनाया कपूर साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांच्या 'वृषभ' या मल्याळम आणि करण जोहरच्या 'बेधडक' या चित्रपटातून अभिनयात पदार्पण करणार आहे. शनायाने अलिकडेच 'गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल' या चित्रपटाचे सह दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे. असे असले तरी काही वर्षापासून तिने अभिनयात प्रवेश करायचा, हे नक्की केले होते.
मिळालेल्या माहितीनुसार करण जोहरने 'स्टुटडंट ऑफ द इयर ३' च्या वेब सिरीजसाठी डिस्ने प्लस हॉटस्टारसोबत हात मिळवणी केली आहेत. हा प्रोजेक्ट सध्या लिखाणाच्या पातळीवर सुरू आहे आणि या वर्षीच्या अखेरीस याचे प्रत्यक्ष शुटिंग सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारच्या या शोमध्ये शनायासोबत नवे चेहरे झळकणार आहेत. या प्रोजेक्टच्या कलाकार निवडीचे कामही समांतर पातळीवर सुरू झाले आहे.
शोबद्दलचा अधिक तपशील अद्याप हाती आलेला नाही. मात्र धर्मा प्रॉडक्शनच्या धर्माटिक एंटरटेन्मेंट या डिजीटल कंटेंट विभागाने या वेब सिरीजवर काम करणे सुरू केले आहे. या मालिकेचा दिग्दर्शक येत्या एक महिन्यात ठरणार आहे. गेल्या दोन वर्षापासून शनाया कपूरच्या बॉलिवूड पदार्पणाची चर्चा सुरू आहे.
शनाया कपूर 'बेधडक' या चित्रपटातून लक्ष्य लालवाणी आणि गुरफतेह पिरजादासोबत पदार्पण करणार होती. मात्र, स्क्रिप्टमध्ये काही त्रूटी जाणवल्याने दिग्दर्शक शशाक खेतान यांनी चित्रपटाचे शुटिंग लांबणीवर टाकले आहे. अखेर, शनाया मल्याळम अभिनेता मोहनलाल यांच्या 'वृषभ' सिनेमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.