मुंबई - चित्रपट निर्माता करण जोहरने नेटफ्लिक्सवरील डॉक्यु मालिका द रोमॅंटिक्स पाहिल्यानंतर यशराज फिल्म्सच्या चित्रपटांना मनापासून सलाम केला आहे. स्मृती मुंद्रा दिग्दर्शित, 'द रोमॅंटिक्स' ही डॉक्यूमेंट्री चित्रपट निर्माते यश चोप्रा यांचा अतुलनीय कारकिर्दीचा प्रवास आणि त्यांचा वारसा सांगते. यात हिंदी भाषेतील चित्रपट उद्योगातील 35 आघाडीचे कलाकार आपले बहुमोल योगदान देताना दिसतात. बॉलिवूडच्या इतिहासात गेल्या 50 वर्षात यशराज फिल्म्सच्या प्रभावाच्या माध्यमातून बॉलिवूडला जागतिक स्तरावर एक उत्तम ओळख मिळाली आहे.
बुधवारी इन्स्टाग्रामवर करण जोहरने त्याच्या अनेक भावना शेअर केल्या. त्यांनी लिहिले, 'नेटफ्लिक्सवरील स्मृती मुंद्रा दिग्दर्शित द रोमँटिक्स ही मालिका पाहिली आणि मला जाणवले की शुद्धता, निर्दोषता आणि आपल्या सर्वांनी एकत्रितपणे केलेला विश्वास... आज आपल्यातील अनेकांसाठी गमावला आहे. यश चोप्रा हे केवळ प्रणयाची आख्यिका नव्हते तर ते शिफॉन, संगीत आणि सौंदर्याचे पारखी होते. ते संगीताचे उस्ताद होते आणि ते विश्वासाचे आधारस्तंभही होते... काही खात्री आहे का? आज आम्ही मीडियाच्या समालोचनाने भारावलो आहोत, बॉक्स ऑफिस ओपनिंग अॅनालिटिक्स, रिसर्च इंजिन्स (सर्व कदाचित तंत्रज्ञान आणि काळाशी संबंधित आहेत) हे सर्व आहे पण जुन्या पद्धतीचा विश्वास कुठे नाहीसा झाला.... रोमँटिक डॉकियूमेंट्री आपल्याला भूतकाळाची आठवण करून देते. खूप नैसर्गिक रित्या आणि मनापासून.... मला चित्रपट निर्मितीच्या त्या झोनमध्ये परत जायचे आहे.'