मुंबई : तब्बल 6 वर्षांनंतर करण जोहर हा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामधून दिग्दर्शनात पुन्हा परत आलेला आहे. तसेच यावर्षी दिग्दर्शक म्हणून करणने 25 वर्षे पूर्ण केले आहे. आतापर्यंतच्या प्रवासाची आठवण म्हणून त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. याशिवाय करणचा २५ मे रोजी वाढदिवस आहे. तो यावर्षी ५१ वर्षांचा होईल.वाढदिवसाच्या निमित्याने तो 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चा फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित करणार असल्याची घोषणा त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. करणने इंस्टाग्रामवर एक मॉन्टेज व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्यांचे आतापर्यंचे हिंट चित्रपटाच्या छोट्या छोट्या काही झलक टाकल्या असून या व्हिडिओमध्ये त्याच्या आवाजासह चित्रपटाच्या बॅकग्राऊंडमध्ये चालत असलेले त्याचे दिग्दर्शनाचे काम देखील दाखविले आहे. त्याने याद्वारे त्याचा हिंदी चित्रपटसृष्टील प्रवास दाखविला आहे. तसेच त्याने चित्रपट निर्माता म्हणून चांगले काम केले आहे.
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपट : व्हिडिओमध्ये सुरुवातीला राहुल, अंजली आणि टीनासह 'कुछ कुछ होता है' मधील क्लासिक सीक्वेन्स टाकले आहे. करण या व्हिडिओत त्याच्या वेगवेगळ्या चित्रपटाचे वर्णन करतांना दिसत आहे. तसेच व्हिडिओची शेवट हा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ने होतांना दिसत आहे, ज्याचे वर्णन त्याने बोलतांना सांगितले आहे की, 'एक चित्रपट मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करण्यासाठी खूप दिवसांपासून वाट पाहत होतो. शेवटी हा चित्रपट तयार आहे. प्रेम, कुटुंब आणि बरेच काही साजरे करण्यासाठी आमच्यासोबत सामील व्हा. असे त्यांने व्हिडिओद्वारे म्हटले आहे.