मुंबई :बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहरने इंडस्ट्रीला अनेक चित्रपट दिले आहेत. नुकतीच त्याने सिनेविश्वात 25 वर्षे पूर्ण केली आहेत. ज्यासाठी त्यांना ब्रिटिश संसदेने सन्मानित केले आहे. 25 वर्षात करण जोहरने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले, त्यापैकी अनेकांचे शूटिंग युनायटेड किंगडममध्येही झाली आहे.करण जोहरला ब्रिटीश संसदेत संसद सदस्यांच्या उपस्थितीत ग्लोबल एंटरटेनमेंटमधील योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. या कर्यक्रमाचे आयोजन पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर येथे करण्यात आले होते. करणसाठी हा दिवस खास आहे, कारण आज त्यांनी चित्रपट निर्माता म्हणून 25 वर्षे पूर्ण केली आहेत. विशेष म्हणजे, कुछ कुछ होता है, ए दिल है मुश्कील इत्यादी सारख्या त्याच्या आयकॉनिक चित्रपटांचे शूटिंग युनायटेड किंगडममध्ये झाली आहे.
करणने सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केला आहे, ज्यात तो हातात सन्मान फ्रेम पकडून आहे. या फोटोत करणने काळ्या रंगाचा सूट परिधान करून यावर एक काळ्या रंगाचा चश्मा घातला आहे. तर दुसऱ्या फोटोत बॅरोनेस वर्मा या करणला सन्मान फ्रेम देताना दिसत आहे. करणने फोटो शेअर करत लिहले, 'आजचा दिवस खूप खास होता! लिसेस्टरच्या आदरणीय बॅरोनेस वर्मा यांच्या हस्ते लंडनमधील ब्रिटिश संसदेच्या सभागृहात सन्मानित झाल्याबद्दल मी भाग्यवान आणि मनापासून कृतज्ञ आहे. मी चित्रपटसृष्टीत चित्रपट निर्माता म्हणून माझे २५ वे वर्ष साजरे केले आणि मी या निमित्याने 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चा टीझर देखील लाँच केला! 'हा त्या दिवसांपैकी एक आहे जिथे मी स्वतःला चिमटा काढतो आणि मला जाणवते की स्वप्ने सत्यात उतरतात. माझ्या प्रवासात तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या निस्सीम प्रेमाबद्दल सर्वांचे आभार. आणि मी तुम्हाला वचन देतो, अजून बरेच काही करणार आहे!