मुंबई: नुकतेच वरुण धवन, कियारा अडवाणी, नीतू कपूर, अनिल कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'जुग जुग जिओ' या चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने चित्रपटाचा निर्माता करण जोहरने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये 'जुग जुग जिओ'चा सीक्वेल हा रूपेरी पडद्यावर येवू शकतो असा इशारा दिला गेला आहे. चित्रपटाची एक झलक शेअर करताना करणने लिहिले की, ' एक चित्रपट ज्याबद्दल मला माहित आहे, ज्याच्या सीक्वेलची प्रेक्षक वाट पाहत आहेत.
जुग जुग जिओ सीक्वेल : जुग जुग जिओ गेल्या वर्षी २४ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. वरुण धवन, कियारा अडवाणी, नीतू कपूर, अनिल कपूर, मनीष पॉल आणि प्राजक्ता कोळी स्टारर हा एक फॅमिली ड्रामा चित्रपट होता, जो 2 विवाहित जोडप्यांभोवती फिरतो. ज्यांना त्यांच्या नात्यात अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. आता हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. ज्यावर करण जोहरने चित्रपटाची आठवण करून देणारा एक व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शन देत लिहिले, 'मला माहित आहे की चित्रपटाच्या सीक्वेलची प्रतीक्षा केली जात आहे'. यावरून असे लक्षात येत आहे की, या चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याची योजना आखली जात आहे.