मुंबई - Kapil Sharma Ad :कॉमेडियन कपिल शर्मा हा नेहमीच चर्चेत असतो. त्याची फनी स्टाइल प्रत्येकाला आवडते. कपिल शर्माच्या शोमध्ये सर्वाधिक वेळा अक्षय कुमार आला आहे. अक्षय नेहमी त्याच्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी कपिलच्या शोमध्ये जातो. या शोमध्ये कपिल आणि अक्षय खूप धमाल करतात. शो दरम्यान कपिल हा नेहमीच अक्षयला खूप प्रोजेक्ट्स करत असल्याची टोमणे देखील मारत असतो. याशिवाय कपिलनं एकदा अक्षयवर जाहिरातीमधून रिप्लेस करण्याचा आरोप देखील शो दरम्यान केला होता. आता याबाबत कपिलनं अक्षयकडून बदला घेतला आहे.
कपिलनं घेतला बदला :काही वर्षापूर्वीकपिल शर्मानं एक जाहिरात काम केलं होत, त्यानंतर त्याचं जाहिरातीत पुढच्या वर्षी अक्षय कुमार दिसला होता. दरम्यान आता त्याचं जाहिरातीत कपिलला परत घेतलं आहे. या नवीन जाहिराताचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये कपिल शर्मा दिसत आहे. या जाहिरातीत कपिलसोबत इन्फ्लुएंसर अगु स्टॅनलीही दिसत आहे. जाहिरातीत कपिल हा विनोदी अंदाजात दिसत आहे.
अक्षय कुमारची उडवली खिल्ली :अक्षय कुमार हा 'द कपिल शर्मा शो'मध्ये त्याच्या सूर्यवंशी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला होता. त्यावेळी कपिलनं अक्षयची त्याच्या कामाबद्दल खिल्ली उडवली होती. यावेळी कपिलनं म्हटलं होत की, 'अक्षय तू 8 चित्रपटांशिवाय माझ्यासारख्या व्यक्तीची जाहिरातीही हिसकावून घेत असेल तर हे योग्य नाही'. यानंतर कपिल पुढं सांगितलं की, 'मी एक जाहिरात केली होती, ती खूप चांगली झाली'. कपिलच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो काही दिवसापूर्वी आंतरराष्ट्रीय टूरवरून परतला आहे. त्याचा 'द कपिल शर्मा' शो यावर्षी बंद झाला. कपिल लवकरच नव्या सीझनसह छोट्या पडद्यावर परतणार आहे. 'द कपिल शर्मा' शो हा खूप लोकप्रिय असल्यानं या शोची टीआरपी खूप असतो. या शोमध्ये कपिल प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करत असतो. दरम्यान प्रेक्षक या शोची आतुरतेनं वाट पाहत आहेत. या शोमध्ये कपिल आणि त्याच्या टीमचा वेगळा अंदाज पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा :
- Aayush Sharma Birthday: सलमान खानचा मेहुणा आयुष शर्माला पत्नी अर्पिता खाननं दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- Elvish Yadav Extortion Call: एल्विश यादवकडून खंडणी मागणारा गजाआड
- Deepika Ranveer wedding video : दीपिका आणि रणवीर सिंगची वेडिंग फिल्म्स 'कॉफी विथ करण 8' मध्ये लॉन्च