मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन अभिनेता कपिल शर्मा हा त्याच्या कॉमेडी नाइट्स विथ कपिल शर्मा या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांना हसवत राहतो. कपिलने काही बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे, ज्यात त्याने जबरदस्त कॉमेडी करून प्रेक्षकांची मने जिंकली आहे. कपिल नेहमीचं त्याच्या शोच्या माध्यमातून चर्चेत असतो. आता कपिल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कपिल चर्चेत असण्याचं कारण म्हणजे त्याची लेक आहे. कपिलने त्याच्या लेकीनेसोबत रॅम्पवॉक केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. रविवारी एका चॅरिटी शो कार्यक्रमात कपिलने हजेरी लावली होती. त्यावेळी कपिल त्याच्या तीन वर्षाच्या मुलीसोबत स्टेजवर रॅम्पवॉक केला.
कपिल लेक अनायरामुळे आला चर्चेत :कपिलचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर इंस्टंट बॉलिवूडने शेअर केला असून या व्हिडीओत कपिलने लेक अनायराला फ्लाइंग किस देण्यास सांगितले. त्यावेळी अनायराने फ्लाइंग किस दिली. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ व्हायरल होताचं अनेक प्रेक्षकांने लाईक करून या व्हिडिओवर, कमेंट केली. कपिलच्या या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हटले, 'हा फारचं क्युट व्हिडीओ आहे.' दुसरा नेटकरी म्हटले, 'तू खूप हसविले. प्रत्येक दिवस तो एक औषध म्हणून आपल्या मदतीसाठी धावून आला, मग तेव्हा तुम्ही आजारी असला किंवा मग उदास, तुझा शो पाहिल्यानंतर सगळं बरोबर झालं असं वाटायचं. लव्ह यू कपिल. तर तिसऱ्या नेटकऱ्याने म्हटले कि, 'भारतीवर गेली आहे.' आणखी एकाने म्हटले, 'अरे यार ही सेम तिची आई गिन्नीसारखी दिसते. आणखी एका नेटकऱ्यांने म्हटले की, कपिलची मुलगी आहे म्हणून नाही तर ती मुलगी खरंच फारचं सुंदर आणि क्युट आहे.