महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Kapil Dev meet Superstar Rajinikanth : साउथ सुपरस्टार रजनीकांत आणि भारतीय पूर्व कप्तान कपिल देव यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल - रजनीकांतसोबत दिसणार ऐश्वर्या

साउथ सुपरस्टार रजनीकांत आणि भारतीय पूर्व कप्तान कपिल देवाचे फोटो सोशल मीडियावर वेगवान व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये कपिल देव हे रजनीकांतसोबत बोलतांना दिसत आहे.

Superstar Rajinikanth
साउथ सुपरस्टार रजनीकांत

By

Published : May 19, 2023, 10:36 AM IST

हैदराबाद : साऊथचा सुपरस्टार रजनीकांत त्याच्या आगामी 'लाल सलाम' या चित्रपटासाठी फार उत्सुक आहे. या चित्रपटाच्या पहिली झलक सोशल मीडियावर आल्यावर प्रेक्षकांच्या चांगल्याचं प्रतिक्रिया मिळत आहे, आणि सध्या सोशल मीडियावर रजनीकांत हे देखील फार सक्रिय झाले आहे. दरम्यान, थलायवाने लाल सलामच्या सेटवरील एक फोटो आणि माजी विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांच्यासोबतचाही फोटो शेअर केली आहे. रजनीकांत यांनी ट्विटर हँडलवर फोटो शेअर करतांच या फोटोला चाहत्यांकडून लाइक्सच्या रूपात भरभरून प्रेम मिळतांना दिसत आहे.

रूपेरी पडद्यावर झळकणार कपिल देव :रजनीकांतने हा फोटो गुरुवारी सुंदर कॅप्शनसह शेअर केला. त्यांनी लिहिले, 'दिग्गज, सर्वात आदरणीय आणि अद्भुत मानव कपिलदेवजी यांच्यासोबत काम करणे हा माझा सन्मान आणि विशेषाधिकार आहे. ज्यांनी भारताला प्रथमच क्रिकेट विश्वचषक जिंकून अभिमान वाटला! असे कॅप्शनसोबतच लिहले आहे. रजनीकांतने संकेत दिला की, या चित्रपटात कपिल देवही एक भूमिका साकारेल.

पुन्हा एकदा रजनीकांतसोबत दिसणार ऐश्वर्या :'लाल सलाम' हा चित्रपट गेल्या वर्षी 5 नोव्हेंबरला पूजा समारंभाच्या वेळी लाँच करण्यात आला होता. या कार्यक्रमातील फोटो शेअर करत ऐश्वर्याने तिच्या ट्विटर पेजवर लिहिले, 'जेव्हा तुमचे वडील तुमच्यावर विश्वास ठेवतात... जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता की देव तुमच्यासोबत आहे, तेव्हा खरोखर चमत्कार घडतात.' '7 वर्षांनंतर कृतज्ञता आणि आनंदाच्या अश्रूंनी प्रवास पुन्हा सुरू होतो.' असे तिने लिहले होते. तसेच या चित्रपटात विष्णू विशाल आणि विक्रांत हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाला ए आर रहमानी संगीत दिले आहे. पहिल्या पोस्टरमध्ये रजनीकांत मोईदीन भाईच्या भूमिकेत दर्शविले गेले आहे , जे 1993मध्ये बॉम्बे (मुंबई)मध्ये जातीय दंगलीच्या वेळी चर्चेत होते. तसेच या चित्रपटाची वाट प्रेक्षक फार आतुरतेने पाहत आहे. कारण या चित्रपटात पुन्हा एकदा रजनीकांतसोबत ऐश्वर्या ही रूपेरी पडद्यावर दिसणार आहे. याआधी रोबोट, आणि 2.0 या चित्रपटात देखील रजनीकांतसोबत ऐश्वर्याने स्क्रीन शेअर केली होती.

हेही वाचा :Priyanka Chopra Share Photo : प्रियांका चोप्राने मुलगी मालती मेरीसोबत खेळतानाचा फोटो केला शेअर

ABOUT THE AUTHOR

...view details