महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Kannada actor Sampath J Ram : कन्नड अभिनेता संपत जे राम याने केली आत्महत्या; राजेश ध्रुवाने केला धक्कादायक खुलासा - कन्नड अभिनेता संपत जे राम याने केली आत्महत्या

कन्नड अभिनेता संपत जयराम याने आत्महत्या केली आहे. त्याचा मित्र आणि सहअभिनेता राजेश ध्रुव याने हा धक्कादायक खुलासा केला आहे.

Kannada actor Sampath J Ram
कन्नड अभिनेता संपत जे राम

By

Published : Apr 26, 2023, 10:06 AM IST

हैदराबाद : प्रसिद्ध कन्नड अभिनेता संपत जयराम यांच्या आत्महत्येप्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेत्याचा जवळचा मित्र आणि सहअभिनेता राजेश ध्रुवने खुलासा केला आहे की संपतचा मृत्यू एका प्रँक दरम्यान झाला होता. 35 वर्षीय कन्नड अभिनेता 22 एप्रिल रोजी त्याच्या नेलमंगला निवासस्थानी लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. पोलीस त्याच्या मृत्यूचा तपास करत आहेत. अशा परिस्थितीत अभिनेत्याच्या खास मित्राचा महत्त्वपूर्ण खुलासा धक्कादायक आहे. कंथारा सिनेमात संपत जयरामने भूमिका केली होती.

दुर्दैवाने गमवावा जीव लागला : राजेश ध्रुव म्हणाले की संपतला त्याच्या पत्नीला धमकावायचे होते, म्हणून त्याने खोटी फाशी घेण्याचा निर्णय घेतला. त्याचा परिणाम खूप धोकादायक झाला आणि त्याचा मृत्यू झाला. संपतच्या सहकलाकाराने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून संपतच्या आत्महत्येबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. राजेशने सांगितले की, घटनेच्या रात्री या जोडप्यामध्ये किरकोळ भांडण झाले. संपतने पत्नीला घाबरवण्यासाठी 'प्रॅंक' खेळण्याचा निर्णय घेतला. दुर्दैवाने यावेळी त्याला आपला जीव गमवावा लागला.

पोस्ट करून वाहिली भावनिक श्रद्धांजली : शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राजेशने लोकांना त्याच्या मृत्यूबाबत कोणतीही खोटी बातमी पसरवू नये अशी विनंतीही केली आहे. संपत यांच्या निधनाने चंदनला मोठा धक्का बसला आहे. एवढेच नाही तर त्याची पत्नी पाच महिन्यांची गरोदर आहे. विशेष म्हणजे अभिनेत्याच्या निधनाच्या बातमीमुळे चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. 22 एप्रिल रोजी राजेशने सोशल मीडियावर संपतचे काही फोटो शेअर केले आणि त्यांना भावनिक पोस्ट देऊन श्रद्धांजली वाहिली आहे, ज्यामध्ये त्याने लिहिले की, तुझा वियोग सहन करण्याची ताकद आमच्यात नाही. अजून किती चित्रपट बनायचे आहेत? किती लढाया लढायच्या बाकी आहेत? तुझी स्वप्ने सत्यात उतरण्यासाठी अजून भरपूर वेळ आहे. अजून मोठ्या मंचावर आपल्याला भेटायचे आहे. कृपया परत ये...

हेही वाचा :Ileana DCruz pregnancy : पहिल्या बाळाच्या स्वागताला इलियाना डिक्रूझ सज्ज, बाळाच्या वडिलाचे नाव मात्र गुलदस्त्यात

ABOUT THE AUTHOR

...view details