मुंबई- बंगाली थिएटरमधील दिग्गज अभिनेत्री विनोदिनी दासी ( Binodini Dasi ) हिच्या जीवनावर आधारित चित्रपट बनणार आहे. विनोदिनी दासी हिला नोटी बिनोदिनी ( Noti Binodini ) या नावानेही ओळखले जात असे. या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका कंगना रणौत साकारणार आहे. परिणीता आणि मर्दानी या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे प्रदीप सरकार आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. प्रकाश कपाडिया (देवदास, तान्हाजी: द अनसंग वॉरियर) यांनी पटकथा लिहिली आहे.अशा प्रकारे इमर्जन्सी चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणारी रणौत आता आणखी एक बायोपिक घेऊन येत आहे.
कंगना चौथ्यांदा रिअल-लाइफ कॅरेक्टर साकारत आहे- मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी, थलायवी (जे जयललिता) आणि आगामी फीचर इमर्जन्सी (इंदिरा गांधी) यानंतर कंगना रनौतचा हा चौथा चित्रपट आहे ज्यामध्ये ती वास्तविक जीवनातील पात्र साकारत आहे. इमर्जन्सी ( Emergency ) चित्रपटाचे शुटिंग पूर्ण झाल्यानंतर पुढील वर्षी कंगना या बायोपिकच्या शुटिंगला सुरुवात करेल अशी अपेक्षा आहे. "मी प्रदीप सरकारजींची खूप मोठा चाहती आहे आणि या संधीसाठी खूप आनंदी आहे. तसेच प्रकाश कपाडिया जी यांच्यासोबतचे हे माझे पहिले सहकार्य असेल आणि या देशातील काही महान कलाकारांसोबतच्या या उल्लेखनीय प्रवासाचा भाग होण्यासाठी मी पूर्णपणे रोमांचित आहे. "असे कंगनाने एका निवेदनात म्हटले आहे.