महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Kangana Ranaut talks : कंगना रणौतने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी केले होते हेही काम - रास्कल आणि डबल धमाल बाबत कंगनाचा खुलासा

कंगना राणौतने एका फॅन पेजद्वारे शेअर केलेला थ्रोबॅक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात ती रास्कल आणि डबल धमाल सारख्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या अपयशांबद्दल स्पष्टपणे बोलताना दिसत आहे. तिने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम स्टोरीज सेक्शनवर शेअर केला आहे.

Kangana reveals about Rascal and Double Dhamaal
रास्कल आणि डबल धमाल बाबत कंगनाचा खुलासा

By

Published : May 11, 2023, 8:05 PM IST

मुंबई- अभिनेत्री कंगना रणौतने एक थ्रोबॅक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती तिच्या रास्कल आणि डबल धमाल या चित्रपटांबद्दल बोलताना दिसत आहे. कंगना म्हणाली की, तिने कधीही कोणताही चुकीचा निर्णय घेतला नाही. कंगनाने इंस्टाग्राम स्टोरीजवर रास्कल्स आणि डबल धमालमध्ये काम करण्याबद्दल बोलत असलेल्या तिच्या फॅन पेजवरून एक जुना व्हिडिओ शेअर केला. या सिनेमासाठी तिने सहाय्यक भूमिका केली होती.

रास्कल आणि डबल धमाल बाबत कंगनाचा खुलासा

कंगना या व्हिडिओत म्हणते, 'आयुष्यात प्रत्येकजण कधीतरी एक चुकीचा निर्णय घेतो. मीही त्याला अपवाद नाही. काही लोक म्हणतात की, माझा तो निर्णय चुकीचा होता. पण मला तसे वाटत नाही. लोकांना वाटते की मी रास्कल आणि डबल धमाल सारखे चित्रपट करायला नको होते. तू याहून अधिक चांगल्या गोष्टींसाठी पात्र आहेस'.

ती पुढे म्हणाली, 'हो, पण तेव्हा माझ्याकडे कोणतेही पर्याय नव्हते, त्यामुळे मी कोणतेही काम छोटे मानले नाही. यासाठी जे काही पैसे मला मिळाले तरीही. माझे जी काही छोटी मोठी स्वप्ने होती मग ते कॅलिफोर्नियात फिल्म कोर्स करणे, न्यूयॉर्क फिल्म अकादमीत जाणे... ही स्वप्ने मी पूर्ण केली'.

तिने शेअर केले की याला चुकीचा निर्णय म्हणता येणार नाही आणि हा सर्व प्लॅनिंगचा भाग होता. कंगनाने याला कॅप्शन दिले: मी अधिक चांगल्यासाठी पात्र आहे हे माहित असतानाही मी कधीही निराश किंवा निंदक झाले नाही... सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी कधीही कोणताही चुकीचा निर्णय घेतला नाही. या सुंदर जुन्या आठवणी क्लिपसाठी माझ्या चाहत्यांचे आभार.

कंगना रणौत तिच्या फिल्म शेड्यूलमध्ये बिझी आहे. ती इमर्जन्सी, तेजस, मणिकर्णिका रिटर्न्स: द लीजेंड ऑफ दिड्डा, चंद्रमुखी 2 आणि द इन्कारनेशन: सीता या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. यापैकी इमर्जन्सी हा चित्रपट ती दिग्दर्शित करत असून इंदिरा गांधीनी लावलेल्या आणिबाणीच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट आधारित आहे. यात ती इंदिरा गांधींची व्यक्तीरेखा साकारेल.

हेही वाचा -Cannes Film Festival 2023 : कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये पदार्पणासाठी मानुषी छिल्लर सज्ज

ABOUT THE AUTHOR

...view details