महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Kangana Ranaut takes dig on KJo : कंगना रणौतचा करण जोहरशी पुन्हा पंगा, सेल्फीच्या अपयशाबद्दल केली बोचरी टीका - करण जोहर

सेल्फी चित्रपटाने पहिल्या दिवशी अपेक्षित कमाई केली नाही, त्यामुळे कंगना रणौतने निर्माता करण जोहरवर बोचरी टीका केली आहे. 'सेल्फी'च्या पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिसचे आकडे निराशा करणारे आहेत. पहिल्या दिवशीची कमाई १ कोटी ३० लाख झाली आहे.

कंगना रणौतचा करण जोहरशी पुन्हा पंगा
कंगना रणौतचा करण जोहरशी पुन्हा पंगा

By

Published : Feb 25, 2023, 10:35 AM IST

मुंबई- करण जोहर निर्माता असेलेल्या 'सेल्फी' चित्रपटाने पहिल्या दिवशी अपेक्षित कमाई केली नाही, त्यामुळे कंगना रणौतने शुक्रवारी निर्माता करण जोहरवर ताशेरे ओढले आहेत. इंस्टाग्राम स्टोरीमध्ये कंगनाने तिच्या पहिल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "करण जोहरच्या सेल्फीने पहिल्याच दिवशी 10 लाखांची कमाई केली आहे, त्याची खिल्ली उडवणे किंवा मम्करी करणे तर दूरच पण ज्या प्रकारे त्यांनी मला त्रास दिला ते ट्रेड किंवा मीडियातील व्यक्ती त्याच्याबद्दल काहीच बोलताना दिसत नाही.

कंगना रणौतचा करण जोहरशी पुन्हा पंगा

तिच्या दुसऱ्या पोस्टवर, कंगनाने 'कंगना रणौतची पुरुष आवृत्ती!' या शीर्षकासह एक बातमी शेअर केली, अक्षयचा 'सेल्फी' दर्शकांना प्रभावित करण्यात अयशस्वी झाल्यामुळे नेटिझन्सची प्रतिक्रिया, कदाचित त्याचा सलग सहावा फ्लॉप...' लेखावर प्रतिक्रिया देत कंगनाने लिहिले, 'मी सेल्फी फ्लॉपच्या बातम्या शोधत होते, मला आढळले की सर्व बातम्या माझ्याबद्दल आहेत... ये भी मेरी ही गलती है...'

कंगना रणौतचा करण जोहरशी पुन्हा पंगा

कंगनाने आणखी काही बातम्या शेअर केल्या. आणि नंतर एका वेगळ्या पोस्टमध्ये निष्कर्ष काढला, 'वेब शेकडो लेखांनी भरलेले आहे जिथे सेल्फी चित्रपटाच्या अपयशाचा दोष माझ्यावर आणि अक्षय सरांनी करण जोहरच्या नावाचा अजिबात उल्लेख केला नाही, अशा प्रकारे माफिया बातम्यांमध्ये फेरफार करतात आणि त्यांच्या कथनाला अनुकूल समज निर्माण करतात.. .

कंगना रणौतचा करण जोहरशी पुन्हा पंगा

दरम्यान, व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरवर याबद्दल सविस्तर आकडे असलेली पोस्ट केली आहे. 'सेल्फी'च्या पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिसचे आकडे निराशा करणारे आहेत. पहिल्या दिवशीची कमाई १ कोटी ३० लाख झाली आहे. २०२३ मध्ये रिलीज झालेल्या पठाण चित्रपटाने पहिल्या दिवशी २७.०८ कोटी केली होती. शेहजादा चित्रपटाची कमाई २.९२ लाख होती. या तुलनेत सेल्फी फारच आश्चर्यकारक रित्या आकडे दाखवत आहेत. तर पठाणने रिलीजच्या ३१ व्या दिवशी ५३ लाखांची कमाई करत पठाण जिंदा है चा संदेश दिला आहे.

राज मेहता दिग्दर्शित सेल्फी हा मल्याळम चित्रपट 'ड्रायव्हिंग लायसन्स' चा अधिकृत हिंदी रिमेक आहे, ज्यात पृथ्वीराज आणि सूरज वेंजारामूडू यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या. हिंदी आवृत्तीमध्ये अक्षय कुमार, इमरान हाश्मी, नुश्रत भरुच्चा आणि डायना पेंटी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

हेही वाचा -Birthday Wishes To Sanjay Leela Bhansali :अजय देवगण ते सोनाक्षी सिन्हा, बॉलिवूड सेलिब्रिटींनी संजय लीला भन्साळींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

ABOUT THE AUTHOR

...view details