मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत अनेकदा कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत येत असते. दरम्यान आता पुन्हा एकदा कंगना चर्चेत आली आहे. सध्या कंगना 'चंद्रयान 3' या मोहिमेमुळे खूप खुश आहे. 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर 'चंद्रयान 3' यशस्वीरित्या उतरले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडरने सॉफ्ट लँडिंग करून एक ऐतिहासिक यश मिळवून दिले. त्यानंतर संपूर्ण जगभरात भारताचे कौतुक झाले. भारत हा पहिला देश ठरला, ज्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवले. या विक्रमामुळे इस्रो साइंटिस्टचे खूप सोशल मीडियावर कौतुक झाले आहेत. दरम्यान, कंगनाने 'चंद्रयान-३' मोहिमेच्या यशामागे इस्रोमधील महिला साइंटिस्टचे कौतुक केले आहे.
कंगनाने केली पोस्ट :कंगनाने रविवारी इंस्टाग्राम स्टोरीजवर इस्रोच्या महिला शास्त्रज्ञांचे छायाचित्र शेअर केले आणि लिहिले, 'भारतातील आघाडीचे साइंटिस्ट, बिंदी, सिंदूर आणि मंगळसूत्र... साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचे प्रतीक... भारतीयत्वाचे खरे सार'. अशी पोस्ट शेअर केली आहे. दरम्यान कंगना 'इमर्जन्सी' या पॉलिटिकल चित्रपटासाठी देखील चर्चेत आहे. ती या चित्रपटात भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे, ज्यात अनुपम खेर, सतीश कौशिक आणि मिलिंद सोमण यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. कंगनाने हा चित्रपट मणिकर्णिका फिल्म्सच्या बॅनरखाली 'इमर्जन्सी'चे दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. हा चित्रपट 24 नोव्हेंबर 2023 रोजी रूपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.