हैदराबाद : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर देशातील वातावरण तापले आहे. चित्रपटसृष्टीपासून ते राजकारणापर्यंत या निर्दयी हत्येवर प्रतिक्रिया दिल्या जात आहे. अनेक बॉलिवूड स्टार्सनी सिद्धू मुसेवाला यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे आणि दुसरीकडे पंजाब सरकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. इकडे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौतने सिद्धू मुसेवालाच्या हत्येप्रकरणी थेट पंजाब सरकारवर निशाणा ( Kangana Ranaut slams AAP govt ) साधला आहे.
सिद्धू मुसेवालाच्या हत्येवर कंगना रणौतने इन्सटाग्रामवर स्टोरी शेअर करताना लिहिले आहे की, 'पंजाबचा प्रसिद्ध चेहरा सिद्धू मुसेवाला ( punjabi singer Sidhu Moose walas murder ) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, ही अत्यंत दुःखद घटना आहे'.
यानंतर कंगनाने तिच्या स्टोरीमध्ये पंजाबच्या आप सरकारवर निशाणा साधत लिहिले आहे की, 'ही घटना पंजाबच्या कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती स्पष्टपणे सांगते'. गेल्या रविवारी काही अज्ञात गुंडांनी सिद्धू मुसेवाला यांच्यावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली होती.