महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Emergency teaser : राजकीय इतिहासातील सर्वात गडद काळ दाखवणारा इमर्जन्सीचा टीझर रिलीज - Kangana Ranaut shares Emergency teaser

कंगना रणौतच्या महत्त्वाकांक्षी राजकीय ड्रामा इमर्जन्सीचा टीझर शनिवारी प्रदर्शित झाला. कंगनाने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट भारतीय इतिहासातील सर्वात वादग्रस्त अध्याय मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. आणीबाणीच्या 48 व्या वर्धापन दिनानिमित्त निर्मात्यांनी चित्रपटाचा टीझर रिलीज केला.

Emergency teaser
इमर्जन्सीचा टीझर रिलीज

By

Published : Jun 24, 2023, 2:13 PM IST

मुंबई- अभिनेत्री-निर्माती कंगना रणौतने शनिवारी इमर्जन्सी या आगामी चित्रपटाचा टीझर रिलाज केला आहे. या चित्रपटातून ती पहिल्यांदाच स्वतंत्रपणे एकटी दिग्दर्शिका म्हणून पदार्पण करत आहे. सोशल मीडियावर कंगनाने इमर्जन्सी चित्रपटाचा टीझर शेअर केला. यामध्ये तिने चित्रपटाच्या रिलीजची तारीखही जाहीर केली आहे. आपल्या इतिहासातील सर्वात गडद काळ असे तिने यात म्हटले आहे.

दिग्दर्शकाची भूमिका निभावत असतानाच कंगनाने इमर्जन्सीमध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचीही भूमिका साकारली आहे. कंगना दिग्दर्शन करीत असलेल्या या चित्रपटात भारताच्या राजकीय इतिहासातील सर्वात मोठ्या घटनेची कथा यात दाखवली जाणार आहे. तत्कालिन पंतप्रधान राहिलेल्या इंदिरा गांधी यांनी देशात आणिबाणीची घोषणा करुन सर्व निर्णय सूत्रे आपल्याकडे ठेवली होती. भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील ही सर्वात महत्त्वाची राजकीय घटना मानली जाते.

इंस्टाग्रामवर आणीबाणीचा टीझर शेअर करताना कंगनाने लिहिले, 'संरक्षक की हुकूमशहा? आमच्या इतिहासाच्या सर्वात गडद टप्प्याचे साक्षीदार व्हा जेव्हा आमच्या राष्ट्राच्या नेतृत्वाने येथील लोकांवर युद्ध घोषित केले होते' चित्रपटाबद्दल बोलताना, कंगना एकदा म्हणाली की आणीबाणी हा 'आपल्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा आणि काळा अध्याय आहे. देशातील तरुण पिढीला आपल्या देशातील सर्वात मोठ्या राजकीय घटनांपैकी एकाची ओळख करून दिली पाहिजे', असेही अभिनेत्री कंगना म्हणाली. कंगना रणौतने असेही सांगितले की, ती भारताच्या इतिहासातील हा विलक्षण भाग मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी उत्साहित आहे.

कंगना रणौत शिवाय इमर्जन्सी चित्रपटामध्ये अनुपम खेर जेपी नारायण आणि महिमा चौधरी यांनी इंदिरा गांधींच्या विश्वासू पुपुल जयकरच्या भूमिका केल्या आहेत. निर्मात्यांनी विशाक नायरला संजय गांधींच्या भूमिकेत आणले तर श्रेयस तळपदे अटल बिहारी वाजपेयींच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट २४ नोव्हेंबरला जगभरात प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी कंगनाने इंदिरा गांधीच्या भूमिकेचा इमर्जन्सी चित्रपटातील आपला लूक शेअर केला होता. ती एक चतुरसत्र अभिनेत्री असून या भूमिकेला ती न्याय देईल अशी चाहत्यांना खात्री आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details