मुंबई - कंगना रणौतने सोमवारी सोशल मीडियावर 'चित्रपट माफिया' बद्दलच्या तिच्या चकित करणार्या विधानांनी वादळ उठवले आहे. चित्रपट क्षेत्रात प्रस्थापित असलेल्यांच्या तालावर ती नाचत नसल्यामुळे तिला अलिप्त ठेवण्यात आल्याचेही तिने म्हटलंय. कंगनाने इंस्टाग्राम स्टोरीजवर पोस्ट्सची मालिका शेअर केली ज्यामध्ये तिने कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडण्यासाठी तिच्यावर कसे संस्कार झाले आहेत याचा उल्लेख केला आहे.
तिच्या लेटेस्ट सोशल मीडिया पोस्टमध्ये, कंगनाने फिल्म माफियावर नवीन हल्ला चढवला, हा शब्द ती बॉलिवूडमधील प्रस्थापित पॉवर प्लेयर्ससाठी उदारपणे वापरते. 35 वर्षीय अभिनेत्री कंगनाने सांगितले की तिची वृत्ती नेहमीच गर्विष्ठपणा मानली गेली आहे तर तिची जडणघडण आणि पालनपोषण तिला तिच्या मूल्य प्रणालीच्या विरोधात असलेल्या गोष्टींना हो म्हणू देत नाही. बॉलिवूडमधील घराणेशाही किंवा नेपोटिझमवर कंगना सतत आरोप करत आली आहे. करण जोहर, आलिया भट्टसह अनेक दिग्गज निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार नेहमी तिच्या निशाण्यावर असतात. त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी ती हातची जाऊ देत नाही. यामुळे अनेक जाणांच्या तिरस्काराचा विषयही ती बनत असते.
कंगनाने हाय प्रोफाइल विवाहसोहळ्यात परफॉर्म करणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींवरही ताशेरे ओढले आहेत. रणौत पुढे म्हणाली की 'फिल्म माफिया' तिला नावे ठेवतात कारण ती इतरांबद्दल गॉसिपिंग टाळते आणि कधीही नायकांच्या खोलीत गेली नाही. अभिनेत्रीने पुढे सांगितले की, तिला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्रास दिला जात आहे आणि लक्ष्य केले जात आहे.' असे म्हणत आपण इतर अभिनेत्रींहून कशी वेगळी असल्याचे सांगण्याचा प्रयत्न तिने केला आहे.