महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Ganapath clashing with Emergency : गणपथ आणि यारिया २ ची रिलीज तारीख ठरल्यानंतर कंगना रणौतच्या अंगाचा तीळ पापड - अभिनेत्री आणि निर्माती कंगना रणौत

टायगर श्रॉफचा गणपथ आणि भूषण कुमार यांचा यारिया २ हे चित्रपट २० ऑक्टोबरला रिलीज होणार असल्यामुळे कंगना रणौत भडकली आहे. नेमक्या याच तारखेला कंगना दिग्दर्शित करत असलेल्या इमर्जन्सी हा चित्रपट रिलीज होणार आहे. त्यामुळे बॉलिवूड माफियांनी तिच्या विरोधात रचलेले षडयंत्र असल्याचे तिला वाटते.

Ganapath clashing with Emergency
Ganapath clashing with Emergency

By

Published : Feb 23, 2023, 5:57 PM IST

मुंबई- अभिनेत्री कंगना रणौतने टायगर श्रॉफच्या 'गणपथ' चित्रपटाचा आणि भूषण कुमारच्या 'यारियां 2' चित्रपटाचा टीझर रिलीज केल्यानंतर या चित्रपटांची टक्कर ती दिग्दर्शित करत असलेल्या चित्रपटाशी होणार असल्यामुळे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. टायगर श्रॉफ आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या गणपथचा टिझर रिलीज झाल्यानंतर कंगनाने आपली प्रतिक्रिया दिली.

कंगनाने तिच्या ट्विटमध्ये संताप व्यक्त केला आणि म्हटले की, 'मी जेव्हा इमर्जन्सी चित्रपटासाठी रिलीजची कारीख शोधत होते तेव्हा लक्षात आले की या वर्षीचे चित्रपट कॅलेंडर बऱ्यापैकी रिकामे आहे. माझ्या चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शनचा विचार करुन मी २० ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली. परंतु एका आठवड्यात ची सिरीजचे मालक भूषण कुमार यांनी २० ऑक्टोबर रोजी त्यांच्या चित्रपटाच्या रिलीजची घोषणा केली, संपूर्ण ऑक्टोबर फ्री आहे म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर आणि अगदी सप्टेंबरदेखील, परंतु आज मिस्टर अमिताभ बच्चन आणि टायगर श्रॉफ यांनी 20 ऑक्टोबर रोजी त्यांच्या महत्त्वाकांक्षी चित्रपटाच्या रिलीजची घोषणा केली, हा हा लगता है पॅनिक मीटिंग्स हो रही है बॉलीवुड माफिया गँग्स में.', असे कंगनाने म्हटलंय.

अभिनेत्री कंगना रणौत एवढ्यावरच थांबली नाही तिने पुन्हा ट्विट केले आणि लिहिले की, 'तिने इमर्जन्सीच्या ट्रेलरच्या रिलीजच्या एक महिना अगोदर रिलीजची तारीख जाहीर केली होती. पण आता आता दोन चित्रपट तिच्या चित्रपटाच्या रिलीजच्या तारखेला विरोध करत आहेत. कंगनाच्या शेवटच्या ट्विटमध्ये आशय होता, आता इमर्जन्सीसाठी रिलीजची तारीख मी ट्रेलरसह फक्त एक महिना अगोदर घोषित करेन, जब सारा साल फ्री है तो संघर्ष की जरुरत क्यूं है भाई? ये बुरी हालत है उद्योग की फिर भी इतनी दुर्बुद्धी, क्या खाते हो यार तुम सब, इतने स्वयं विनाशकारी कैसे हो?'

इमर्जन्सी या चित्रपटाची दिग्दर्शिका, अभिनेत्री आणि निर्माती कंगना रणौतचा हा चित्रपट तिच्यासाठी खूप खास असणार आहे कारण हा चित्रपट तरुण पिढीला इंदिरा गांधीच्या काळात लागू झालेल्या आणिबाणीची कथा सांगणार आहे. इमर्जन्सी चित्रपटात तिने भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. वाशू भगनानी यांचा 'गणपथ' हा टायगर श्रॉफ, क्रिती सॅनन आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भूमिका असलेला अ‍ॅक्शन चित्रपट असेल. तसेच, भूषण कुमारचा 'यारियां 2' चित्रपट हा 2014 चा सिक्वेल चित्रपट आहे, हा चित्रपटही २० ऑक्टोबरला रिलीज होईल. टायगर श्रॉफ, क्रिती सॅनन आणि अमिताभ बच्चन यांचा गणपथ आणि भूषण कुमारच्या 'यारियां 2' नंतर कंगना रणौतच्या इमर्जन्सीसह या दसर्‍याला बॉलिवूड तीन चित्रपटांचे थिएटरमध्ये स्वागत करण्यासाठी सज्ज आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांची टक्कर पाहणे नक्कीच मनोरंजक असेल.

हेही वाचा -Schin Shroff Wedding : सचिन श्रॉफ दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर, वधूचे नाव गुलदस्त्यात

ABOUT THE AUTHOR

...view details