मुंबई - Tejas Special Screening :अभिनेत्री कंगना रणौत संरक्षण मंत्री आणि भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्यांसाठी तिच्या आगामी 'तेजस' चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यासाठी सज्ज झाली आहे. काही वेळापूर्वी कंगना ही मुंबई एअरपोर्टवर झळकली. यावेळी तिनं तिच्या आगामी 'तेजस' चित्रपटाबद्दल माहिती दिली. कंगनानं सांगितलं की, 'आज आम्ही एका खास कार्यक्रमासाठी जात आहोत. आम्ही आमच्या 'तेजस' स्पेशल स्क्रीनिंग हे संरक्षण मंत्री आणि वायुसेनेच्या अधिकाऱ्यांसाठी आयोजित केले आहे. या स्क्रीनिंगला भारतीय हवाई दलाचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. मला आशा आहे की सर्वकाही चांगले होईल'.
'तेजस' स्पेशल स्क्रीनिंग :आज दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्यांसाठी 'तेजस' चिपटाचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित केल्यानं कंगना ही खूप उत्साहीत दिसली. कंगनाचा 'तेजस' 27 ऑक्टोबरला चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. सर्वेश मेवाडा दिग्दर्शित या चित्रपटाची कहाणी हवाई दलातील वैमानिक तेजस गिलच्या विलक्षण प्रवासाभोवती फिरणारी आहे. हा चित्रपट प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारा आणि अभिमान जागृत करणार असणार आहे. या चित्रपटामध्ये भारतीय हवाई दलाचे वैमानिक आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी कसे अथक परिश्रम घेतात हे दाखवण्यात आलंय.