महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Kangana Ranaut : कंगना रणौतचा हॉरर कॉमेडी 'चंद्रमुखी २'चा फर्स्ट लूक प्रदर्शित - रजनीकांत

कंगना रणौतचा 'चंद्रमुखी २' या चित्रपटामधील फर्स्ट लुक समोर आला आहे. कंगना या चित्रपटाद्वारे साऊथ चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.

Kangana Ranaut
कंगना राणौत

By

Published : Aug 5, 2023, 1:04 PM IST

मुंबई :कंगना रणौत ही बॉलिवूडची बोल्ड 'क्वीन' आहे. ती अनेकदा कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर बोलताना दिसते. कंगना तिच्या विधानांप्रमाणेच तिच्या चित्रपटांसाठीही खूप चर्चेत असते. कंगना गेल्या अनेक दिवसांपासून 'चंद्रमुखी २' चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील अभिनेता राघव लॉरेन्सचा फर्स्ट लूक समोर आला होता. यानंतर चाहते कंगनाच्या फर्स्ट लूकची वाट पाहत होते. दरम्यान आता निर्मात्यांनी 'चंद्रमुखी २' मधील कंगना रणौतचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे, यामध्ये ती एका नृत्यांगनेची भूमिका साकारणार आहे. या लूकमध्ये ती खूप जबरदस्त दिसत आहे. आज ५ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेला तिचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

वेगळ्या भूमिकेत कंगना रणौत : यापूर्वी चित्रपटाचा एक टीझर शेअर करून कंगनाची पहिली झलक दाखवण्यात आली होती. 'चंद्रमुखी २'मधील कंगनाच्या फर्स्ट लूकमध्ये ती ग्रीन लेहेंगाच्या सेटमध्ये सजलेली दिसत आहे. तिने यामध्ये मांग टीका, गळ्यात मोठा हार, कंबरेला पट्टा आणि हातात ब्रेसलेट चेन, अंगठी परिधान केली आहे. या लूकमध्ये ती खूप खास दिसत आहे. काल निर्मात्यांनी चित्रपटाचा एक व्हिडिओ जारी केला होता, ज्यामध्ये 'फॅशन', 'राझ २', 'तनु वेड्स मनू', 'क्रिश ३', 'क्वीन', 'मणिकर्णिका' यासह कंगनाची लोकप्रिय पात्रे दाखविण्यात आली. आता निर्मात्यांनी चंद्रमुखी उर्फ ​​कंगना रणौतचा लूक प्रदर्शित करून चाहत्यांना एक भेट दिली आहे.

'चंद्रमुखी २' चित्रपटात रजनीकांतही दिसणार : 'चंद्रमुखी २' हा २००५ मध्ये आलेल्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'चंद्रमुखी'चा सीक्वल आहे. २००५ मध्ये आलेल्या 'चंद्रमुखी' चित्रपटात रजनीकांतने डॉ. सरावनन आणि वेट्टय्यान राजा यांची भूमिका साकारली होती, तर ज्योतिकाने चंद्रमुखीची मुख्य भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली होती. 'चंद्रमुखी' हा चित्रपट त्यावेळी ब्लॉकबस्टर ठरला होता. सीक्वलमध्ये, राघव लॉरेन्सने वेट्टय्यान राजा आणि कंगनाने चंद्रमुखीच्या आत्म्याची भूमिका साकरली आहे. या चित्रपटात राघव लॉरेन्स आणि कंगना रणौत यांच्याशिवाय रजनीकांतही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'चंद्रमुखी २' हा चित्रपट सप्टेंबरमध्ये गणेश चतुर्थीला तामिळ, तेलुगु, हिंदी, मल्याळम आणि कन्नडमध्ये रिलीज होणार आहे.

हेही वाचा :

  1. Genelia D'souza : जेनेलिया डिसूझाने कमी वयात गाठले यशाचे शिखर; जाणून घ्या तिच्याबद्दल काही विशेष गोष्टी...
  2. Kajol Devgan : काजोलने आपल्या अभिनयाच्या जोरावर काबीज केली बॉलिवूड चित्रपटसृष्टी....
  3. Akeeli trailer : 'अकेली' चित्रपटाचा थरारक ट्रेलर रिलीज, नुश्रत भरुच्चाने जिंकली प्रेक्षकांची मने

ABOUT THE AUTHOR

...view details