महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Kangana Ranaut Birthday : कंगना रणौतने वाढदिवसानिमित्त दिला मनापासून संदेश, आई-वडिलांचे मानले आभार - बॉलिवूडची क्वीन

बॉलिवूडची 'क्वीन' कंगना राणौतचा आज 36 वा वाढदिवस आहे. या खास प्रसंगी कंगनाने सोशल मीडियावर एक सुंदर संदेश शेअर केला आहे. काय म्हणाली घ्या जाणून...

Kangana Ranaut Birthday
कंगना रणौत

By

Published : Mar 23, 2023, 1:20 PM IST

Updated : Mar 23, 2023, 1:43 PM IST

मुंबई :कंगना राणौत बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. स्वबळावर तिने चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवला आहे. बॉलिवूडची 'झांसी की रानी' म्हणून प्रसिद्ध असलेली कंगना रणौत आज तिचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने आपल्या पालकांचे आभार मानले आहेत.

बॉलिवूडची क्वीन देसी लूकमध्ये : कंगनाने तिच्या वाढदिवशी इंस्टाग्रामवर एक गोंडस इमोजीसह एक व्हिडिओ पोस्ट केला असून, 'आज माझा वाढदिवस आहे, माझ्या हृदयातून आलेला संदेश' असे कॅप्शन दिले आहे. व्हिडिओमध्ये बॉलिवूडची 'क्वीन' देसी लूकमध्ये दिसत आहे. या खास प्रसंगी कंगनाने हिरव्या आणि जांभळ्या रंगाची साडी निवडली आहे. या साडीसोबत तिने सोन्याचा जड नेकलेस, झुमका आणि ब्रेसलेट कॅरी केले आहे. कंगनाने हलका मेकअप करून तिचा लूक पूर्ण केल्याचे दिसून येत आहे.


कंगनाचा खास संदेश :या व्हिडीओमध्ये कंगनाने तिच्या आई-वडिलांचे आभार व्यक्त करत म्हटले की, 'आज माझ्या वाढदिवसानिमित्त मी माझे आई-वडील, कुल देवी, सद्गुरु, चाहत्यांचे आभार मानते. यासोबतच त्या सर्व लोकांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करू इच्छिते, ज्यांनी मला नेहमीच लढायला शिकवले. पुढे कसे चालायचे हे शिकवले. त्याचीही मी सदैव ऋणी आहे. माझा स्वभाव साधा आहे. मी अनेकदा नफा-तोट्यातून उठते आणि भविष्यासाठी चांगले असेच वर्तन ठेवण्याचा प्रयत्न करते. यामुळे कोणी दुखावले गेले असेल तर मी त्या लोकांची माफी मागते. मला असे वाटते की माझे जीवन खूप भाग्यवान आहे. माझ्या मनात कोणाबद्दलही द्वेष नाही. जय कृष्णा. बॉलिवूड क्वीनने नुकतेच 'चंद्रमुखी 2'चे शूटिंग पूर्ण केले आहे. कंगनाने तिच्या पाइपलाइनमध्ये 'इमर्जन्सी', 'मणिकर्णिका रिटर्न्स: द लीजेंड ऑफ दिड्डा', 'तेजस' आणि 'द अवतार: सीता' देखील आहेत.

हेही वाचा :Pathaan On OTT : पठाण अतिरिक्त दृश्यांसह ओटीटीवर रिलीज...

Last Updated : Mar 23, 2023, 1:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details