महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

kangana ranaut and PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या ट्रोल झालेल्या व्हिडिओवर कंगना रणौतची प्रतिक्रिया, म्हणाली.... - जो बिडेन

kangana ranaut and PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर झालेल्या ऑनलाइन ट्रोलिंगवर कंगना रणौतनं प्रतिक्रिया दिली आहे. कंगनानं ट्रोल्सवर चांगलीच आगपाखड केली आहे. तसंच यावेळी अनेकजण तिचे समर्थन करताना दिसत आहेत.

Kangana Ranaut And Pm Modi
कंगना रणौत आणि पी मोदी

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 13, 2023, 7:42 PM IST

मुंबई - kangana ranaut and PM Modi :पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता या व्हायरल व्हिडिओवर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतची प्रतिक्रिया आली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पीएम मोदींच्या हातात ग्लास आहे आणि यादरम्यान जो बिडेन त्यांना काही बोलताना दिसत आहेत. तसंच व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदी हे हसताना दिसत आहेत. मोदींच्या या व्हिडिओवर अनेकजण कमेंट करत आहेत. सोशल मीडियावर अनेक यूजर्स पीएम मोदींची खिल्ली उडवत आहेत. त्यानंतर कंगनानं आता या सर्व ट्रोलर्सना प्रत्युत्तर दिलं आहे. इतकंच नाही तर अनेक युजर्सनी कंगनाचं याबद्दल समर्थन केलं आहे.

कंगनानं दिलं ट्रोलर्सना उत्तर :कंगनानं लिहिलं की, 'मनुष्याच्या डोक्यावर कसले कलियुग नाचत आहे, जो जनावरांचं मांस किंवा रक्त खात नाही, जो कधीही धूम्रपान किंवा दारू पीत नाही, अशा चांगल्या माणसाचा अपमान केला जात आहे'. असं तिनं एक्सवर लिहिलं आहे. कंगना अनेकदा पीएम मोदींचं कौतुक करते. गेल्या वर्षी पीएम मोदींच्या वाढदिवशी कंगनानं त्यांना ग्रहावरील सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हटलं होतं. कंगनानं लिहिलं होतं, 'बालपणी रेल्वे प्लॅटफॉर्मवर चहा विकण्यापासून ते आता पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली माणूस बनण्यापर्यंतचा तुमचा प्रवास किती छान होता. मी तुमच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. आम्ही सर्व भाग्यवान आहोत की तुम्ही आमचे नेते आहात.

कंगनाचे व्यावसायिक जीवन : कंगनाच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर ती आता 'चंद्रमुखी 2' या चित्रपटात दिसणार आहे. हा एक तमिळ चित्रपट आहे, ज्यात राघव लॉरेन्स मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात कंगना चंद्रमुखीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटामध्ये कंगनाचा हॉरर लूकही चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. 'चंद्रमुखी 2' चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. हा ट्रेलर चाहत्यांनी खूप पसंत केला आहे.

हेही वाचा :

  1. Mahima Chaudhary Birthday : महिमा चौधरीनं 'या' चित्रपटापासून केलं होतं बॉलिवूडमध्ये पदार्पण...
  2. Satinder Kumar Khosla Death : बिरबल हरपला, ज्येष्ठ विनोदी अभिनेते सतींदर कुमार खोसला काळाच्या पडद्याआड
  3. Happy birthday Prachi Desai : प्राची देसाईनं चित्रपटसृष्टीत कसं यश मिळवलं, जाणून घ्या तिचा आजवरचा प्रवास

ABOUT THE AUTHOR

...view details