मुंबई कंगना रणौत ( Kangana Ranaut ) इमर्जन्सी ( Emergency ) हा तिचा आगामी चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. या चित्रपटात ती पहिल्यांदाच तिची अभिनयातील गुरू अरविंद गौर ( Arvind Gaur ) यांना दिग्दर्शित करणार आहे. तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर कंगनाने गुरूसोबतचा फोटो कॅप्शनसह टाकला आहे.
तिने लिहिले, आज मला माझे अभिनयातील गुरू अरविंद गौरजी यांना दिग्दर्शन करण्याचे मोठे भाग्य लाभले आहे. त्यांनी वयाच्या १६ व्या वर्षी मला मार्गदर्शन केले. मी सरांना माझ्या दिग्दर्शनाखालील इमर्जनीमध्ये कॅमिओसाठी विनंती केली आणि ते माझ्यासोबत आहेत.” तिने परिचय करून देणारी आणखी एक पोस्ट देखील शेअर केली. ती म्हणाली, "अरविंद हे एक उत्तम थिएटर दिग्दर्शक आहेत... आज दिग्दर्शकाला दिग्दर्शित करत आहे."
फोटोत कंगना पांढऱ्या चिकनकारी सूटमध्ये तिच्या गुरूचा हात धरून संभाषण करताना दिसत आहे. कंगना या चित्रपटासाठी नियमित काम करत आहे. किंबहुना, काही आठवड्यांपूर्वी डेंग्यूने त्रस्त असतानाही तिने काम केले होते.