मुंबई - अभिनेत्री कंगना रणौत वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत राहत असते. लेटेस्ट इनस्टाग्राम स्टोरीमध्ये कोणाचेही थेट नाव न घेता एका बनावट पती पत्नीवर टीकास्त्र सोडले आहे. ज्या प्रकारचे वर्णन तिने या जोडीचे केले आहे त्यावरुन ही जोडी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट असल्याचा तर्क लावला जात आहे. काही दिवसापूर्वी नीतू कपूर लंडनमध्ये होत्या. त्यांच्या वाढदिवसासाठी रणबीर एकटाच लंडनला गेला होता आणि आलिया आपल्या मुलीसोबत मुंबईतच थांबली होती. याचाही उल्लेख या पोस्टमध्ये नकळत दिसतो.
कंगनाने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिलंय की, 'नकली नवरा बायकोची आणखी एक बातमी. ते दोघेही वेगवेगळ्या जागेत राहात असतात आणि दाखवतात की ते जोडपे आहेत. हे जोडपे न बनलेल्या चित्रपटांच्या घोषणांबाबत फेक न्यूज पसरवत असतात. मिंत्रा हा स्वतःचा ब्रँड असल्याचे सांगत असतात.'
कंगनाने पुढे लिहिलंय की, 'याशिवाय कोणीही असे लिहिले नाही की त्याने कशा प्रकारे अलिकडच्या सुट्टीमध्ये पत्नी आणि मुलीकडे दर्लक्ष केले. खरंतर हा तथाकथित पती मला टेक्स्ट पाठवून भेटायला बोलवत होता. या नकली जोडीचा पर्दाफाश करण्याची गरज आहे.'
कंगनाने पोस्टमध्ये पुढे लिहिलंय की, 'चित्रपटांचे प्रमोशन, पैसे कमावणे आणि कामासाठी जेव्हा कोणी लग्न करत असतात तेव्हा असेच होते. त्याला वचन देण्यात आले होते की पापाच्या परीसोबत विवाह केल्यास त्याला ट्रायालॉजी ( तीन चित्रपटांचा एकत्रीत गुच्छ) त्याला रिटर्नमध्ये मिळणार आहे. या ट्रायालॉजी चित्रपटाचा डबा बंद झाला आहे आणि आता या नकली लग्नातून बाहेर पडायची त्यांची इच्छा आहे.' हा ट्रायालॉजी चित्रपट म्हणजे ब्रम्हास्त्र असल्याचा तर्क लावला जात आहे.