मुंबई- अभिनेत्री कंगना रणौतवर काही ना काही बातम्या छापल्या जात असतात, अर्थात हे तिला हवेही असते. मात्र एखादी रिपोर्ट तिच्या मनासारखे नसेल तर ती त्यावर कशी प्रतिक्रिया देईल याचा अंदाज करता येत नाही. अलकिकडे तिच्यावर टीका करणाऱ्या एक अहवालावर तिने तुफान टीका केली आहे. 2015 मध्ये विनय सप्रू आणि राधिका राव दिग्दर्शित 'आय लव्ह NY' चित्रपटात कंगनाने सनी देओलसोबत काम केले होते. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करु शकला नाही. आपले करियर उध्वस्त होईल या भीतीने या चित्रपटाचे प्रदर्शन होऊ नये यासाठी कंगनाने प्रयत्न केला होता, असा दावा एका अहवालात करण्यात आला होता.
या अहवालातील दाव्याचे खंडन कंगना रणौतने केले आहे. सनी देओलची प्रशंसा करताना कंगनाने 'गदर २' या चित्रपटाला भरघोस यश मिळेल असा अंदाज व्यक्त केला आणि तथाकथिच अहवालावर टीकाही केली. कंगना म्हणाली, ' 'गदर २' हा चित्रपट यावर्षाचा सर्वोत मोठा ओपनर असले. पण इथे कसं आहे की कंगनाच्या नावाचा वापर करुन एखाद्याची बदनामी कशी करायचे याचे मार्गदर्शन केले जात आहे. आता इर्षा वाटू लागली आहे, कारण स्वतःचा चित्रपट वर्षातला सर्वात कमी ओपनर ठरला आहे. पुन्हा एकदा माझ्याशिवाय दुसरी कोणतीही अभिनेत्री असा सततचा द्वेषाचा सामना करु शकत नाही.'
'मला भेटणारा किंवा सोबत काम करणारा प्रत्येकजण हेच बोलतो की, 'मीडियात' तुझ्याबद्दल अशी भयंकर मते का आहेत. आम्ही अनेकांसोबत काम केले आहे, पण तू तर सर्वात प्रोफेशनल आणि टॅलेंटेड आहेस. माझ्यासोबत काम करणारे मीडियात माझी स्तुती करतात, पण प्रचार काही थांबत नाही.' असे ती पुढे म्हणाली.
कंगनाने काही मीडिया रिपोर्टसही शेअर केले आहेत, ज्यात तिचे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर कसे अपयशी ठरले त्याचे तपशीलवार वर्णन आहे. 'दररोज माझ्यावर १० -१५ लेख छापले जातात जे माझे सर्व चित्रपट कसे फ्लॉप होते हे जाहीर करतात. ज्या चित्रपटांची कमाई 150 कोटी झाली आहे त्यांनाही ते त्याच यादीत धरतात. लोक इतरांबद्दल इतकी घृणा बाळगून कसे जगतात, रात्रंदिवस षडयंत्र करतात, स्वतःचे पैसे इतरांसाठी दुर्बुद्धी मिळविण्यासाठी कसे काय खर्च करतात?'
अभिनेत्री कंगना पुढे म्हणाली, 'मी चित्रपट माफियामुळे वेडी नाही. मला नवल याचे वाटते की देवाने त्यांना इतक्या वेदनेतून केस जाऊ दिले. इतकी गहरी अस्वस्थता आणि चिंता असणे ही तर नरकाची व्याख्याच नाही का? माझ्याबद्दल ते काही तरी भयंकर करत नाहीत किंवा माझ्या कारकिर्दीला बाधा आणणाऱ्या गोष्टी करत नाहीत, तोवर मी त्यांची दखलही घेत नाही. मला सहन करण्यापलीकडे जात नाही तोपर्यंत मी त्यांचा विचारही करत नाही. ते सतत माझ्याबद्दल का विचार करत राहतात याची कल्पना करु शकत नाही. '