मुंबई - अभिनेत्री दीपिका पदुकोणची ऑस्कर 2023 मध्ये झळकल्याबद्दल तिचे कंगना रणौतने मोकळेपणाने कौतुक केले आहे. अलिकडे पठाण चित्रपटात चमकलेल्या अभिनेत्री दीपिकाने अकादमी पुरस्कार सोहळ्याला सादरकर्ती म्हणून हजेरी लावली होती आणि आरआरआरच्या पॉवर-पॅक्ड नाटू नाटू या गाण्याला जोरदार प्रोत्साहन दिले होते. नाटू नाटू गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीसाठी अकादमी पुरस्कार जिंकला. ऑस्करमधील नाटू नाटू गाण्याच्या लाइव्ह परफॉर्मन्सला सर्वांनी स्टँडिंग ओव्हेशन दिले.
कंगनाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर दीपिकाचे कौतुक करत ती किती सुंदर दिसते आहे याबद्दल लिहिले. कंगना म्हणाली की अशा प्रतिष्ठित व्यासपीठावर संपूर्ण देशाला एकत्र ठेवून, त्याची प्रतिष्ठा आणि प्रतिमा त्या नाजूक खांद्यावर वाहणे आणि इतके प्रेमळ आणि निर्भयपणे बोलणे सोपे नाही. भारतीय महिला सर्वोत्कृष्ट आहेत आणि दीपिका हे त्याचे ज्वलंत उदाहरण असल्याचे तिने म्हटलंय. 'दीपिका किती सुंदर दिसत आहे, संपूर्ण देशाला एकत्र धरून, तिची प्रतिमा, प्रतिष्ठा त्या नाजूक खांद्यावर घेऊन तिथे उभी राहणे सोपे नाही आणि किती सहज आत्मविश्वासाने ती बोलली. दीपिका भारतीय महिला सर्वोत्तम आहेत याची साक्ष म्हणून ताट उभी आहे', असे कंगनाने ट्विट केले आहे.