मुंबई - Kamal Haasan Birthday : साऊथ अभिनेता कमल हासन आज 7 नोव्हेंबर रोजी आपला 69वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी त्यांना अनेकजण शुभेच्छा देताना दिसत आहेत. सध्या कमल हासन त्यांच्या आगामी प्रोजेक्टमुळं चर्चेत आहे. त्यांच्या आगामी 'ठग लाइफ' चित्रपटातील सहकलाकारांचा फर्स्ट लुक शेअर करण्यात आला आहे. कमल हासनच्या वाढदिवसानिमित्त साऊथ सिनेसृष्टीतील स्टार्सही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. साऊथ स्टार प्रभासनं वाढदिवसाच्या शुभेच्छा देत लिहलं, 'एका अभिनेत्यापासून ते एक दिग्गज आणि नंतर एक आयकॉन... आम्ही तुम्हाला पाहात मोठं झालोय. कमल हसन सर, तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, मी भाग्यवान आहे की तुमच्यासोबत काम केलं.'
कमल हसन यांचा वाढदिवस :कमल हासन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना 'ठग लाइफ'मधील सहअभिनेत्री त्रिशा कृष्णननं लिहलं,' वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कमल हासन सर, तुमच्यासोबतच्या चित्रपटाचा अनुभव खूप छान होता'. हिंदी चित्रपटसृष्टी आणि साऊथ चित्रपटसृष्टीतील अभिनेता सिद्धार्थनं कमल हासनला शुभेच्छा देत एक पोस्ट लिहली. या पोस्टमध्ये त्यानं लिहलं, 'कमल हासन सर, ग्रेटेस्ट वाढदिवसाच्या शुभेच्छा. याशिवाय 'इंडियन 2' चे दिग्दर्शक शंकर यांनी देखील कमल हासन यांना 'इंडियन 2'चे बीटीएस फोटो शेअर करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.