महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Kajol Devgan : सलाम वेंकी चित्रपटात काजोल साकारतेय आईची भूमिका, 'हा' अभिनेता करतोय स्पेशल रोल - Aamir Khan

अभिनेत्री काजोल देवगणची प्रमुख भूमिका असलेला सलाम वेंकी नावाचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. काजोलने त्या निमित्ताने ईटिव्ही भारतसोबत खास बातचित केली आहे. (Salaam Venky Movie, Actress Kajol Devgan Interview, Aamir Khan)

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Dec 9, 2022, 3:26 PM IST

मुंबई :अभिनेत्री काजोल देवगणने नुकतेच सलाम वेंकी नावाचा चित्रपटाचे शुटींग पुर्ण केले आहे. काजोल म्हणाली की, लग्न झाल्यावर मुलांसाठी मी घरात वेळ देण्याला प्राधान्य दिले. मी त्यांना या जगात आणले तर त्यांच्या संगोपनाची जबाबदारी पण माझीच आहे. मला कोणीही जबरदस्ती केली नाही. उलट माझी सासू मला सांगत होती की, काम करणे सोडू नकोस. आम्ही सर्व आहोत मुलांची काळजी घ्यायला. परंतु मला त्यांचे बालपण त्यांच्यासोबत जगायचे होते. आई झाल्यावर भावनांमध्ये आमूलाग्र बदल होतो. माझी मुलगी निसाचा जन्म झाल्यावर मी स्वतःला सांगत होते की, एक आई म्हणून मला त्या परीक्षेत फेल व्हायचे नाही. पहिले वर्ष मी शिकत होते. तिच्या पहिल्या वाढदिवशी मी हुश्श म्हणाले.

सलाम वेंकी

आईच्या साधेपणात सौंदर्य आहे : माझी मुले जगातील सर्वात बेस्ट मुले आहेत आणि जगातील सर्वात परफेक्ट आई मी आहे. सलाम वेंकी मधील आईसोबत मी रीलेट् करू शकते. प्रत्येक आई आपल्या मुलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत असते. हा चित्रपट सत्य गोष्टीवर आधारित आहे. यातील आईच्या साधेपणात सौंदर्य आहे आणि ती पडद्यावर साकारणे इतकी सोपी गोष्ट नाही आहे. ते व्यक्तिमत्त्व शांत आहे आणि आपली भीती आपल्या मुलाच्या स्वप्नांच्या आड येऊ नये यासाठी झटत असते. पडद्यावर साधेपणा साकारणे सर्वात कठीण काम असते.



चित्रपटात आमिर खानचा स्पेशल रोल :रेवती ने अप्रतिम दिग्दर्शन केले आहे. यात स्वेच्छामरण यावर उहापोह करण्यात आला आहे. कोणीही कायद्याच्या विरोधात नाही आहे. परंतु या चित्रपटामुळे त्यावर संवाद साधला जाईल अशी आशा आहे. रेवतीने कुठेही तरलपणा सोडलेला नाही. हा कुटुंब, लोक, भावभावना आणि नात्यांवर बोलणारा चित्रपट आहे. रेवती खूप दयाळू आहे, तिच्यात खूप संयम आहे आणि उत्तम ती दिग्दर्शिका आहे. या चित्रपटात आमिर खानचा स्पेशल रोल आहे. तो सिनेमासाठी नेहमी ५००% टक्के देतो, असे काजोल म्हणाली.



संहिता उत्तम असेल तरच मी चित्रपटासाठी होकार देते : तिला मराठीत काम करणार का असे विचारल्यावर तिने मराठीत उत्तर देत सांगितले की, का नाही? मी आता जास्त चूझी झाले. माझे वाचन खूप आहे. त्यामुळे संहिता उत्तम असेल तरच मी चित्रपटासाठी होकार देते. भाषा माझ्यासाठी अडचण नाही आहे. मी नुकताच एक तामिळ चित्रपट केला आहे. अप्रतिम स्क्रिप्ट असेल तर मला मराठी आणि बंगाली चित्रपटात काम करायला नक्कीच आवडेल. मला स्वतःला आता एक धमाल कॉमेडी फिल्म करायची आहे. कारण मला नेहमी वाटते की, मी कॉमेडी उत्तम करू शकते. मी सतत जोक्स करीत असते, अगदी स्वतःवर देखील. रोज मी स्वतःला हसवते.

विशाल जेठवा मुलाच्या भूमिकेत :रोहित शेट्टीने अजय देवगण सोबत इतके कॉमेडी चित्रपट केले आहेत, मग रोहित शेट्टी बरोबर का काम करत नाही? असे विचारल्यावर काजोल उत्तरली, मला नक्की आवडेल त्याच्यासोबत कॉमेडी चित्रपट करायला. मी अगदी गोलमाल मधील गोपाल (अजय देवगणची भूमिका) सुद्धा उत्तम साकारू शकेन. सर्वांना आर्जव आहे की, सलाम वेंकी नक्की बघा कारण आम्ही सर्व दोन वर्ष मेहनत करून चित्रपट तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आम्ही आमच्या परीने उत्तम प्रयत्न केले आहेत, ते गोड मानून घ्या. त्याला थप्पड मारू नका. काजोल अभिनित सलाम वेंकीमध्ये विशाल जेठवा तिच्या मुलाच्या भूमिकेत दिसेल आणि हा चित्रपट ९ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details