मुंबई - Kajol Durga : बॉलिवूडमधील अनेक कलाकार दरवर्षी दुर्गा पूजा पंडालला भेट देऊन मातेसमोर नतमस्तक होतात. दरम्यान दुर्गा मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी मुंबईतील जुहू येथील बंगाली समाजानं आयोजित केलेल्या नॉर्थ बॉम्बे सार्वजनिक दुर्गा पंडालमध्ये अभिनेत्री काजोल उपस्थित राहिली. ती दुर्गापूजेसाठी पारंपारिक लूकमध्ये पोहोचली होती. यावेळी काजोलनं पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. यावर तिनं मेकअप लाईट केला होता व आपल्या लुकला आणखी खास बनविण्यासाठी तिनं केसांचा टॉप नॉट बनवला होता. तिनं लाल रंगाची टिकली, बांगड्या आणि कानातलं घालून तिचा लूक पूर्ण केला, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. यावेळी तिनं देवीच्या मूर्तीसमोर खूप फोटो देखील क्लिक केले.
काजोलचे फोटो झाले व्हायरल :काजोलचे दुर्गा पूजेमधील फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिनं काका देब मुखर्जीसोबत फोटो क्लिक केले. दरवर्षी जुहू येथे नॉर्थ बॉम्बे सार्वजनिक दुर्गापूजेचं आयोजन काजोलच्या काकाकडून केलं जातं. यावेळी काजोलन तिची चुलत बहीण शरबानी मुखर्जीसोबत दुर्गा पूजा केली. शरबानी मुखर्जीने हिरव्या रंगाची साडी नेसली होती. यावर तिनं सोन्याच्या दागिन्यांसह तिचा लूक पूर्ण केला. या लूकमध्ये ती खूप खास दिसत आहे. एक व्हिडिओमध्ये या दोघीही दुर्गापूजेत उत्साहानं सहभागी होताना दिसत आहेत. काजोल ही दरवर्षी न चुकता दुर्गा पंडालमध्ये मातेच्या दर्शनाला जात असते.