मुंबई - kajol devgan :आजकाल, एआयचा गैरवापर होत असल्याचं दिसत आहे. अनेक बातम्या यासंदर्भात येत आहेत. अलीकडे, एआय डीपफेक व्हिडिओ व्हायरल होऊ लागले आहेत. अभिनेत्री रश्मिका मंदान्ना याचा पहिला बळी ठरली होती. यानंतर आणखी काही बॉलिवूड सेलिब्रिटीही या प्रकाराचे बळी ठरले आणि आता प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा एक मार्फ व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. रश्मिकाप्रमाणेच काजोलचा चेहरा या व्हिडिओमध्ये वापरण्यात आला आहे. काजोलचा चेहरा दुसऱ्या महिलेवर वापरला गेला आहे.
काजोलचा व्हिडिओ व्हायरल : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक महिला कपडे बदलताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया इन्फ्लुएंसर रोझी ब्रीनचा आहे. रोझीनं तिचा हा व्हिडिओ टीक टॉकवर पोस्ट केला होता. या व्हिडिओसोबत छेडछाड करण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये रोझी 'गेट रेडी विथ मी ट्रेंड' फॉलो करत आहे. व्हिडिओमध्ये ती कॅमेऱ्यासमोर कपडे घालून तयार होत आहे. या व्हिडिओमध्ये काजोलचा चेहरा रोझीवर वापरला गेला आहे. हा व्हायरल व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिल्यास, काजोलच्या चेहऱ्याशिवाय, रोझीचा चेहरा देखील त्यात हलका दिसत आहे.
काजोलच्या डीपफेक व्हिडिओ :रश्मिका मंदान्नाचा चेहरा वापरून डीपफेकची प्रक्रिया सुरू झाली होती. रश्मिकाचा चेहरा भारतीय वंशाच्या परदेशी ब्लॉगरवर वापरण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये, डीपनेक आउटफिट घातलेली एक मुलगी लिफ्टमधून बाहेर येताना दिसत होती. व्हायरल झालेल्या व्हिडिओत रश्मिकाचा चेहरा सुपरइम्पोज केलेला आहे. अमिताभ बच्चनपासून ते विजय देवरकोंडा आणि मृणाल ठाकूर यांनी या व्हिडिओवर आपला आक्षेप व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रश्मिका चांगलीच निराश झाली होती. इतकेच नाही तर कतरिना कैफही डीपफेकची शिकार झाली 'टायगर 3' मधील कॅटचा टॉवेल सीनमधील फोटो व्हायरल झाला होता. डीपफेकची बळी सारा तेंडुलकरही पडली आहे. साराचा भाऊ अर्जुनसोबतचा फोटो शुभमन गिलच्या चेहरा वापरून छेडछाड करण्यात आला होती.
पीएम मोदी डीपफेक्सबद्दलही बोलले :या घटनेनंतर यावर सरकारनं ठोस पावले उचलली आहेत. पंतप्रधान मोदींनी या संपूर्ण प्रकरणाचा निषेध केला आहे. अराजकता निर्माण करणारी ही बाब असल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय त्यांनी त्यांचा गरबा खेळताना एक डीपफेक व्हिडिओ पाहिला असल्याचंही म्हटलंय.
हेही वाचा :
- अभिजीत सावंतमुळं पक्षपात झाला, उपविजेत्या अमित सानाची इंडियन आयडॉलवर टीका
- भर स्टेजवर सलमाननं केला इमरान हाश्मीचं चुंबन घेण्याचा प्रयत्न, व्हिडिओ व्हायरल
- सलमान आणि कतरिना कैफच्या 'टायगर 3' नं 200 कोटींचा टप्पा ओलांडला