मुंबई -सिंघम चित्रपटाची अभिनेत्री काजल अग्रवाल आणि तिचा व्यावसायिक पती गौतम किचलू यांनी बुधवारी त्यांच्या नवजात मुलाचे नाव उघड केले. काजलने एका मुलाला जन्म दिल्याचे वृत्त मंगळवारी व्हायरल झाले परंतु जोडप्याने अधिकृतपणे ही बातमी जाहीर केली नव्हती. एका दिवसानंतर गौतमने इन्स्टाग्रामवर त्यांच्या मुलाचे नाव सांगितले.
मंगळवारी सकाळी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात बाळाचा जन्म झाला. आई आणि मूल दोघेही ठीक आहेत. काजल आणि गौतमने बाळाचे नाव 'नील किचलू' असे ठेवले आहे. इंस्टाग्रामवर गौतमने बुधवारी मुलाचे नाव उघड केले आणि लिहिले, "आमची अंतःकरणे भरली आहेत आणि आम्ही कृतज्ञ आहोत. तुमच्या प्रेम आणि आशीर्वादांसाठी सर्वांचे आभार."