मुंबई :रजनीकांत यांच्या 'जेलर' चित्रपटातील 'कावला' हे पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. हा चित्रपट लवकरच रूपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान आता तमन्ना भाटिया चित्रपटामधील गाण्यात डान्स फ्लोअरवर रजनीकांतसोबत डान्स नंबरमध्ये दिसत आहे. नेहमीप्रमाणेच, तमन्नाने तिच्या किलर मूव्ह्सने गाण्यात जीव आणला आहे. दरम्यान, या गाण्यात रजनीकांत देखील त्याच्या सिग्नेचर सनग्लास फ्लिप करताना दिसत आहे.
आयटम साँग : ट्विटरवर निर्मात्यांनी चित्रपटाचा 'कावला' गाण्याचा व्हिडिओ प्रदर्शित केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'कावलाची वेळ आली आहे. लिरिक्स व्हिडिओ रिलीज झाला आहे'. या गाण्यात डान्स मूव्ह्स व्यतिरिक्त, तमन्नाने एक्सप्रेशन्स फार जबरदस्त दिले आहे. तसेच गाण्यात, रजनीकांत देखील आपल्या हटके अंदाजात दिसला आहे. या गाण्यात, तमन्नाने टुपीस परिधान केला आहे. याशिवाय तिने केस हे कुरळे करून मोकळे सोडले आहे. या हेअरस्टाइलमध्ये ती फार हटके दिसत आहे. चित्रपटातील या आयटम साँगमुळे चाहते फार प्रभावित झाले आहे. या चित्रपटाचे सिनेमेट्रोग्राफर विजय कार्तिक कन्नन असून हा चित्रपट फार जास्त जबरदस्त असणार आहे, हे या गाण्यावरून दिसून येत आहे.