महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Samantha Ruth Prabhu : सामंथा रुथ प्रभूने सोशल मीडियावर शेअर केले जबरदस्त फोटो - सामंथा रुथ प्रभूने काही खास फोटो

अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोमध्ये ती फार सुंदर दिसत आहे.

Samantha Ruth Prabhu
सामंथा रुथ प्रभू

By

Published : Jul 31, 2023, 6:31 PM IST

मुंबई :साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरहिट अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू काही दिवसांपासून इंडोनेशियामध्ये आहे. सामंथाने फिल्म इंडस्ट्रीतून काही काळासाठी ब्रेक घेतला असून ती तिच्या आयुष्याचा पुरेपूर आनंद सध्या घेत आहे. सामंथा सध्या सोशल मीडियावर तिचे काही बालीमधील खास फोटो चाहत्यांसोबत शेअर करत आहे. सामंथाची जीवन जगण्याची शैली तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. सामंथाच्या बाली व्हेकेशनच्या फोटोंनी चाहत्यांची मने जिंकली आहेत. आता पुन्हा एकदा सामंथाने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बालीमधील तिच्या सुंदर फोटोंवर सामंथाचे चाहते प्रेमाचा वर्षाव करत असून या फोटोवर खूप कमेंट येत आहेत.

सामंथाने अभिनयातून घेतला ब्रेक : 'सिटाडेल इंडिया' आणि 'खुशी'चे शूटिंग पूर्ण केल्यानंतर, सामंथाने अभिनयातून ब्रेक घेतला आणि तिच्या मैत्रिणीसोबत चिल करण्यासाठी बाली (इंडोनेशिया) येथे गेली. त्यानंतर आता सामंथा एकामागून एक पोस्ट शेअर करत आहे. तिच्या काही फोटोवरून असे वाटत आहे की, ती तिच्या या सुट्टीचा आनंद पुरेपूर घेत आहे. तिने तिच्या पोस्टमध्ये कॅप्शन देत तिने लिहले, आयुष्य थोडं जगा असे तिने पोस्टमध्ये सांगितले आहे. सामंथाने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये ती समुद्रकिनार्यावर मनची शांतता शोधत आहे. याशिवाय तिच्या काही फोटोमध्ये तिने अनेक स्वादिष्ट पदार्थाचेही फोटो पोस्ट केले आहे.

सामंथा 'खुशी' चित्रपटात झळकणार :याआधी सामंथाने उल्लुवातु मंदिरातील बालीमधील फोटो शेअर केला होता. दरम्यान नुकतीच तिने मंकी फॉरेस्टलाही भेट दिली होती. याठिकाणी एका माकडाने तिचा चष्मा काढून घेतला होता. याबद्दल सामंथाने पोस्ट शेअर करून तिच्या चाहत्यांना सांगितले होते. इतकंच नाही तर सामंथाने या माकडासोबतचा तिचा सेल्फी देखील शेअर केला होता. सामंथाचा हा फोटो खूप मजेदार होता. चालू वर्षी प्रदर्शित झालेल्या 'शाकुंतलम' या चित्रपटात सामंथा शेवटची दिसली होती. तसेच यापूर्वी तिचा 'यशोदा' (२०२२)मध्ये चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता सामंथा साऊथ स्टार विजय देवरकोंडासोबत 'खुशी' या चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. Raghava Lawrence shares first look : 'चंद्रमुखी २' मधील राघव लॉरेन्सचा 'वेट्टय्यान राजा' फर्स्ट लूक प्रसिद्ध
  2. Made in Heaven Season 2 : झोया अख्तरचा 'मेड इन हेवन सिझन २' 'या' तारखेला होणार रिलीज
  3. Zinda Banda Song Trolled : 'जवान'मधील 'जिंदा बंदा' गाण्यावर भडकले ट्रोलर्स, अनेक गोष्टींवर आक्षेप

ABOUT THE AUTHOR

...view details