महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

ज्युनियर एनटीआर जपानमधून सुखरुप परतला, सोशल मीडियावर व्यक्त केली भावना - जपान

Jr NTR Escaped Japan Earthquake : साऊथचा अभिनेता ज्युनियर एनटीआर जपानमध्ये काही दिवस होता. 2 जानेवारी रोजी, त्यानं एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं जपानमधील भूकंपाबद्दलचा अनुभव व्यक्त केला आहे.

Jr NTR Escaped Japan Earthquake
ज्युनियर एनटीआर जपानच्या भूकंपातून बचावले

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 2, 2024, 11:19 AM IST

मुंबई - Jr NTR Escaped Japan Earthquake : नवीन वर्ष 2024 जपानसाठी भयानक ठरलं आहे. 1 जानेवारी रोजी जपानमध्ये भूकंपामुळे झालेल्या विध्वंसाची भयानक दृश्ये सध्या पाहायला मिळत आहेत. साऊथ सुपर स्टार ज्युनियर एनटीआरनं 2 जानेवारीच्या रात्री जपानमध्ये झालेल्या भूकंपाबद्दल एक पोस्ट एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, ''मी आज जपानहून मायदेशी परतलो. गेल्या अनेक दिवसांपासून जपानमध्ये असल्यामुळं या घटनेबद्दल मला खूप धक्का बसला आहे. जपानमधील लोकांसाठी मी शोक व्यक्त करतो''. 2024 च्या पहिल्याच दिवशी जपानमध्ये खळबळ उडाली होती. ज्युनियर एनटीआरनं सांगितले की तो बरेच दिवस जपानमध्ये राहिला होता. भूकंपाच्या अवघ्या काही तासांपूर्वी तो तेथून निघून गेला होता.

ज्युनियर एनटीआरनं शेअर केली पोस्ट : एनटीआर आणि त्यांचे कुटुंबीय एकमेकांसोबत क्वालिटी टाईम घालविण्यासाठी अनेकदा विदेशात जातात. यावर्षी त्यांनी ख्रिसमस आणि नवीन वर्ष जपानमध्ये साजरे केले. एनटीआरची पत्नी लक्ष्मी प्रणती आणि त्यांची दोन मुले अभय आणि भार्गव यांनी जपानमध्ये नवीन वर्षाचं स्वागत केले. 1 जानेवारी रोजी ज्युनियर एनटीआर, त्यांची पत्नी आणि दोन मुले हैदराबाद विमानतळावर दिसले होते. विदेशात जाण्यासाठी एनटीआर कामातून थोडा ब्रेक घेतला होता. एनटीआर दिग्दर्शक कोरटाला शिवाच्या 'देवरा' चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे. त्याचा हा चित्रपटदोन भागात रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

एनटीआरचा देवरा चित्रपट :1 जानेवारी रोजी 'देवरा'च्या निर्मात्यांनी एक नवीन पोस्टर रिलीज केलं होतं. या पोस्टरद्वारे त्यांनी 8 जानेवारीला पहिली झलक या चित्रपटाची पाहायला मिळेलं, असं त्यांनी सांगितलं होतं. 'देवरा'चा पहिला भाग 5 एप्रिलला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये एनटीआर व्यतिरिक्त जान्हवी कपूर आणि सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिकेत आहेत. जान्हवी ही या चित्रपटाद्वारे साऊथ चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. एनटीआरच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचं तर तो 'वॉर 2'मध्ये हृतिक रोशनसोबत दिसणार आहे. याशिवाय तो अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहेत.

हेही वाचा :

  1. सोनाली बेंद्रेनं हरिद्वारमध्ये कुटुंबासोबत नवीन वर्ष केले साजरे
  2. अक्षय कुमार आणि ज्युनियर एनटीआरनं आगामी चित्रपटांचे पोस्टर केले शेअर
  3. रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी लवकरच लग्नबंधनात अडकणार

ABOUT THE AUTHOR

...view details