महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

आजोबा एनटी रामाराव यांना श्रद्धांजली वाहताना ज्युनियर एनटीआरच्या डोळ्यात तरळले अश्रू - 28वी पुण्यतिथी

Jr NTR : दिवंगत साऊथ सुपरस्टार एनटी रामाराव यांची 28वी पुण्यतिथी असून ज्युनियर एनटीआरनं हैदराबादमधील एनटीआर गार्डन येथे त्यांना श्रद्धांजली वाहली आहे. यावेळी या गार्डनमध्ये लोकांची प्रचंड गर्दी दिसली.

Jr NTR
ज्युनियर एनटीआर

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 18, 2024, 12:28 PM IST

मुंबई - Jr NTR: दिवंगत साऊथ सुपरस्टार एनटी रामाराव यांची 28वी पुण्यतिथी आज 18 जानेवारी रोजी आहे. या प्रसंगी साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआरनं हैदराबादमधील एनटीआर गार्डन येथे असलेल्या त्यांच्या समाधीला भेट देऊन त्याच्या आजोबांना श्रद्धांजली वाहिली. श्रद्धांजली वाहत असताना त्याच्या डोळ्यात पाणी आले होते. यावेळी ज्युनियर एनटीआरसोबत अनेक राजकारणी आणि अभिनेते देखील श्रद्धांजली वाहण्यासाठी यावेळी आले होते. ज्युनियर एनटीआर हा अभिनेता कल्याण रामसोबत यावेळी पोहचला होता. इथले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दिवंगत साऊथ सुपरस्टार एनटी रामाराव यांची पुण्यतिथी : ज्युनियर एनटीआर काळ्या रंगाची हुडीमध्ये दिसत आहे. यावर त्यानं फेस मास्क देखील घातला आहे. व्हिडिओमध्ये सुरक्षा रक्षक काही लोकांना हटवतांना दिसत आहेl. ज्युनियर एनटीआरसोबत काळ्या शर्टमध्ये आलेला कल्याण रामही सीनियर एनटीआरला श्रद्धांजली वाहतो आहे. ज्युनियर एनटीआरचे आजोबा एनटी रामाराव हे चित्रपटसृष्टीसोबतच राजकारणातही सुपरहिट ठरले. 18 जानेवारी 1996 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यानंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली होती. एनटी रामाराव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेकजण एनटीआर गार्डनमध्ये पोहचले होते.

ज्युनियर एनटीआरचा आगामी चित्रपट :ज्युनियर एनटीआर चालू वर्षात त्याचा अ‍ॅक्शन चित्रपट 'देवरा पार्ट 1 ' चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कोरटाला शिवा यांनी केलंय. 'देवरा पार्ट 1 ' चित्रपटामध्ये त्याच्यासोबत हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री जान्हवी कपूर असणार आहे. या चित्रपटातून जान्हवी ही साऊथ सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. दरम्यान, 'देवरा पार्ट 1 'मध्ये सैफ अली खान खलनायकाच्या भूमिकेत दिसेल. हा चित्रपट 5 एप्रिल 2024 रोजी तेलुगू तसेच तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदीमध्ये रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची अनेकजण आतुरतेनं वाट पाहत आहेत. याशिवाय एनटीआर हा 'वॉर 2'मध्ये हृतिक रोशनसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपट दिग्दर्शन अयान मुखर्जीनं केलं आहे. हा चित्रपट 14 ऑगस्ट 2025 रोजी रिलीज होईल.

हेही वाचा :

  1. महेश बाबू स्टारर 'गुंटूर कारम'नं देशांतर्गत 100 कोटीचा टप्पा केला पार
  2. वाढदिवशी आई प्रियांका आणि बाबा निकसह चिमुकली मालती मेरी देवीच्या चरणी लीन
  3. "अयोध्येत मी माझ्या पूर्वजांचे प्रतिनिधित्व करीन": अनुपम खेर राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार

ABOUT THE AUTHOR

...view details