हैदराबाद: सुपरस्टार ज्युनियर एनटीआर आपल्या कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवत आहे. सोमवारी, तो हैदराबाद विमानतळावर त्याची पत्नी लक्ष्मी प्राणथी आणि त्याची दोन मुले, अभय आणि भार्गव यांच्यासोबत दिसला. उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी ते परदेशात गेले. ज्युनियर एनटीआर आणि त्यांच्या कुटुंबाचे फोटो व्हिडिओ सध्याला सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. तसेच सोशल मीडियावर या फोटोबाबत फार चर्चेत होताना दिसत आहे.
विमानतळावर झळकला ज्युनियर एनटीआर : एका व्हिडिओमध्ये ज्युनियर एनटीआर आपला धाकटा मुलगा भार्गवचा हात धरताना दिसत आहे. तसेच व्हिडिओमध्ये त्याचा मोठा मुलगा अभय याने निळा टी-शर्ट घातला आहे तर भार्गवने हिरवा रंगाचा टी-शर्ट घातला आहे, आणि ज्युनियर एनटीआरने ब्लॅक टीशर्टसह मॅचिंग जॅकेट व निळ्या जीन्समध्ये आपला लुक कॅज्युअल ठेवला आहे. एनटीआर पत्नी प्राणथीने पांढऱ्या रंगाच्या टॉप आणि निळ्या जीन्समध्ये आहे. या लूकमध्ये ती फार सुंदर दिसत आहे. ज्युनियर एनटीआरला त्याच्या कुटुंबासह फार कमी वेळा स्पॉट होतो. त्यामुळे, त्याचे चाहते त्याच्या पत्नी आणि दोन मुलांसह अभिनेत्याचे फोटो पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. तसेच यावेळी ज्युनियर एनटीआरने विमानतळावर फोटोग्राफरांना फोटो काढताना एक स्माईल दिली.